अमंलबजावणी संचलनालयाने (ईडी) पुण्यातील बिटकॉईन फसवणूक प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली आहे. त्याच अनुषंगाने ईडी पथकाने समांतर तपास सुरु केला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील व सायबर तज्ञ पंकज घाेडे यांचा चौकशीसाठी ताबा मागितला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -अमंलबजावणी संचलनालयाने (ईडी) पुण्यातील बिटकॉईन फसवणूक प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतली आहे. त्याच अनुषंगाने ईडी पथकाने समांतर तपास सुरु केला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील व सायबर तज्ञ पंकज घाेडे यांचा चौकशीसाठी ताबा मागितला आहे अशी माहिती पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे. Bitcoin fraud case ED demanded two cyber expert accused custody for investigation
पुणे शहर पाेलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सन २०१८ मध्ये क्रिप्टाे करन्सी मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेक गुंतवणुकदारांना फसविल्या प्रकरणी दत्तवाडी व निगडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. सदर गुन्हयाचे तपासात तत्कालीन तपासी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेल्या आराेपींकडून तांत्रिक पुरावे गाेळा करणे व क्रिप्टाे करन्सी संबंधी गुन्हयातील मालमत्ता जप्त करणेसाठी क्रिप्टाे करन्सी मधील व्यवहाराची माहिती असलेल्या तांत्रिक तज्ञांची मदत घेतली हाेती. त्यात ग्लाेबल ब्लाॅकचेन फाऊंडेशन, पुणे तर्फे पंकज घाेडे व के.पी.एम.जी. या आंतरराष्ट्रीय कंपनी तर्फे रविंद्र पाटील यांचा समावेश हाेता. मात्र, त्यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना, अटक आराेपींकडून जप्त करण्यात आलेल्या क्रीप्टाे करन्सी जप्त करताना त्यातील काही बीटकाॅईन हे परस्पर स्वत:च्या तसेच इतरांच्या खात्यावर वळविली. या केपीएमजी कंपनी यांनी रवींद्र पाटील विरोधात तक्रार दाखल न केल्याने तसेच चौकशीसाठी सहकार्य न केल्याने त्यांना या गुन्ह्यात सीआरपीसी ४१(ए) नुसार चौकशी करीता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पाटीलकडे आणखी १५० ते २०० आभासी चलन
बीटकाॅईनच्या गुन्हयात तांत्रिक सल्लागार म्हणून पुणे पाेलीसांना मदत करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील व पंकज घाेडे यांनी मनी लाॅड्रिंगच्या माध्यमातून काेटयावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब पाेलीसांच्या तपासात समाेर आली आहे. आराेपींच्या बीटकाॅईन वाॅलेट खात्यातून परस्पर स्वत:च्या व इतरांच्या खात्यावर वर्ग केल्याचे दिसून आले. त्यानुसार आत्तापर्यंत रवींद्र पाटील याच्यकडून सहा कोटीचे आभासी चलन जप्त करण्यात आले.मात्र, पोलिसांनी आणखी सखोल तपास केला असता १५० ते २०० आभासी चलन निष्पन्न झाले आहे. दरम्यान, रवींद्र पाटील याची पत्नी आणि भाऊ हे चौकशीसाठी पोलिसां समोर हजर झाले आहे. पाटील यांच्या घरात ट्रेझर वॉलेट मिळून आले असून त्याचा पासवर्ड अद्याप न मिळाल्याने पाटील पती आणि पत्नीची सामोरा समोर चौकशी करण्यात आली आहे.
अजय भारद्वाजची पोलिसांकडून चौकशी
बिटकॉइन गुन्ह्यात प्रामुख्याने मुख्य आरोपी म्हणून दिल्ली येथील रहिवासी असलेल्या अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी अमित भारद्वाज याचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुबई येथे ही फरार कालावधीत भारद्वाज बंधू वास्तव्यास होते. अजय भारद्वाज याचा जामीन सर्वाच्च न्यायालयात फेटळाला जाईल या भीतीने तो पुणे सायबर पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाला आहे. पोलिसांनी सुमारे आठ ते नऊ तास त्याची सखोल चौकशी करून त्यास पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले आहे. तपासा दरम्यान आरोपीने संबंधित गुन्हा मयत भाऊ अमित भारद्वाज याने केल्याचे सांगत आपला या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App