रविंद्र पाटीलचा केपीएमजी कंपनीत संचालक ते भागीदाराचा प्रवास; रविंद्र पाटील व पंकज घाेडेच्या जामीन अर्जास पाेलीसांचा विराेध


बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेले आराेपी सायबर तज्ञ पंकज घाेडे आणि माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांच्या जामीन अर्जास विराेध करणारे पाेलीसांचे लेखी स्वरुपातील म्हणणे गुरुवारी सादर करण्यात आलेले आहे. Pune cyber police opposed the bail application of Bitcoin fraud case accused pankaj ghode and ravindra patil


विशेष प्रतिनिधी

पुणे :बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेले आराेपी सायबर तज्ञ पंकज घाेडे आणि माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांना न्यायालयीन काेठडी मिळालेली असून त्यांनी जामीनाकरिता पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात याप्रकरणी सदर दाेघांच्या जामीन अर्जास विराेध करणारे पाेलीसांचे लेखी स्वरुपातील म्हणणे गुरुवारी सादर करण्यात आलेले आहे. दरम्यान, रविंद्र पाटील हा हाँगकाँग मधील निवासी करदाता असल्याचे व हाँगकाँगला ये-जा करत असल्याची माहिती तपासात समाेर आली आहे. त्याचप्रमाणे केपीएमजी या कंपनीत पूर्वीत ताे संचालक म्हणून काम करत हाेता मात्र, नंतरच्या काळात ताे कंपनीचा भागीदार म्हणून कार्यरत झाल्याचे दिसून आले आहे.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी रविंद्र पाटील याच्याकडे ट्रेजर वाॅलेट मिळालेले असून अद्याप त्याचा युजरनेम व पासवर्ड त्याने पाेलीसांना दिलेला नाही. जामीन मिळून ताे बाहेर आल्यास त्याचे वाॅलेट उघडून संबंधित क्रिप्टाेकरन्सी लंपास करु शकताे. त्याच्या विराेधात सुरु असलेल्या तपासातील डिजीटल पुरावे ताे छेडाछाड करु शकताे, संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे नष्ट करु शकताे. बीटकाॅईन विक्रीतून जी मालमत्ता त्याने खरेदी केली त्याची विल्हेवाट लावू शकताे. आतापर्यंत त्याच्या ताब्यातून सहा काेटीचे बीटकाईन जप्त करण्यात अाले असून २४० बीटकाॅईन त्याने घेतल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे.आराेपी पंकज घाेडे याने परदेशात माेठया प्रमाणात आर्थिक व्यवहार केले आहे. त्याबाबतची माहिती मिळविण्यात येत असून त्याने स्थापन केलेल्या वेगवेगळया कंपन्यात गुंतवणुकीस पैसे नेमके काेठुन आले याबाबत चाैकशी करण्यात येत आहे. पंकज घाेडे आणि रविंद्र पाटील यांनी दत्तवाडी व निगडी पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात पाेलीसांसाेबत काम करताना आराेपींच्या खात्यातून एकूण २४१ बीटकाॅईन आणि ४५२ बीटकाॅईन कॅश (टाेकन) हस्तगत केले आहे. मात्र, यादरम्यान पंकज घाेडे व रविंद्र पाटील यांनी परस्पर त्यांच्या व इतरांच्या क्रिप्टाेकरन्सी खात्यावर बिटकाॅईन वळविल्याचे चाैकशीत निषपन्न झाले आहे.

दरम्यान,पंकज घाेडे याच्या वतीने एड.एस.के.जैन यांनी तर रविंद्र पाटील याच्या वतीने एड.राेहन नहार यांनी न्यायालयात गुरुवारी बाजू मांडत दाेघांना जामीन देण्यात यावा अशी मागणी केली आहे. ऍड.नहार युक्तिवाद करताना म्हणाले, रविंद्र पाटील हे पाेलीसांना तपासात सहकार्य करत हाेते ते सरकारी सेवेत नव्हते. त्यांनी काेणत्या कागदपत्रात खाडाखाेड केलेली नाही. त्यांच्या ताब्यात काेणत्या गाेष्टी देण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे फसवणुक करण्याचा प्रश्न नाही. तपासाच्या दृष्टीने ते पाेलीसांना सहकार्य करण्यास तयार असल्याने सर्शत जामीन मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासंर्दभात सरकारी वकील आज न्यायालयात बाजू मांडणार आहे.

Pune cyber police opposed the bail application of Bitcoin fraud case accused pankaj ghode and ravindra patil

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण