निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार


विशेष प्रतिनिधी

चंडीगड : पंजाबमध्ये अतंगर्त कलहामुळे कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र, त्याचे खापर एका उमेदवाराने जनतेवर फोडले आहे. आपल्या नवीन गाण्यात जनतेला गद्दार म्हणणारा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला चांगलाच अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे या गायकाला पंजाब कॉँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिध्दू यांनी यूथ आयकॉन म्हटले होते.Congress candidate who defeted in election called the people traitors

मुसेवाला याने काँग्रेसच्या तिकिटावर मानसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. आम आदमी पाटीर्चे उमेदवार डॉ. विजय सिंगला यांनी त्याला ६३ हजार मतांनी पराभूत केले. तो निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी काँग्रेसमध्ये गेला होता. आपल्या नव्या गाण्यात मुसेवालाने काँग्रेसमध्ये जाण्याचा आपला निर्णय योग्य होता असे म्हणत लोकांना सवाल केला आहे की, गद्दार कोण आहे?



या गीतात वादग्रस्त शब्द असून, खलिस्तान समर्थन सिमरनजीत सिंह मानचे नावही आले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.मुसेवालाचे म्हणणे आहे की, निवडणुकीतील पराभवावर हे गाणे आधारित आहे. या गाण्यावर आपने प्रश्चचिन्ह उपस्थित केले असून, काँग्रेसकडून उत्तर मागितले आहे.

या गाण्यात त्याने काँग्रेसची प्रशंसा केली आहे. मला अनेकजण म्हणतात की, तुझा पक्ष योग्य नाही. यावर तो म्हणतो की, तुमचे म्हणणे योग्य असेल तर पक्ष आधी का जिंकला होता? तीन वेळा या पक्षाला का विजय मिळाला? याचे उत्तर कोणाकडे नाही.

Congress candidate who defeted in election called the people traitors

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात