वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी हे ‘मनसे’चे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. Biggest political developments in Maharashtra: Nitin Gadkari to meet Raj Thackeray
अर्थात ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक हे स्पष्ट नाही. पण या भेटीने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. आताची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे.
‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. अशातच भाजपचे नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि ‘मनसे’ युतीची ही चर्चा सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App