मुंबईतील सर्वात मोठा जमीन व्यवहार! बॉम्बे डाईंगच्या १८ एकर जमिनीची ५ हजार कोटींना विक्रीची जोरदार चर्चा

जपानी समूह सुमिटोमो यांना विकली गेल्याचे सांगितले जात आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : किमतीच्या दृष्टीने हा शहरातील सर्वात मोठा जमीन व्यवहार ठरू शकतो. अधिकृत पुष्टी  जरी अद्याप समोर आलेली तरी, वरळीतील पांडुरंग बुधकर मार्गावरील बॉम्बे डाईंगच्या मिलची १८ एकर जमीन सुमारे ५,००० कोटी रुपयांना जपानी समूह सुमिटोमो यांना विकली गेल्याचे जमीन मुंबईमधील खरेदी-विक्री  बाजारातील सूत्रांकडून सांगितले जात  आहे. Biggest land deal in Mumbai Bombay Dinings 18 acre land sale for 5000 crores

या आठवड्याच्या सुरुवातीस, लॉ फर्म वाडिया गांधीने त्यांच्या अनामित ग्राहकाच्या वतीने एक सार्वजनिक नोटीस जारी केली, ज्यामध्ये वरळीतील एक लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या जमिनीचे अधिकार, मालकी आणि हितसंबंध तपासण्याची मागणी करण्यात आली होती.

असे दिसून आले की, बुधवारी दुपारी वरळी येथील विस्तीर्ण बॉम्बे डाईंग मिलच्या आत, वाडिया ग्रुपचे मुख्यालय असलेल्या वाडिया इंटरनॅशनल सेंटर (WIC) बाहेर टेम्पो रांगेत उभे आहेत. इमारत रिकामी केली जात असून अध्यक्षांचे कार्यालय दादर-नायगाव येथील बॉम्बे डाईंगच्या जागेत स्थलांतरित झाले आहे. वाडिया मुख्यालयाच्या मागे, शिल्पा शेट्टीच्या मालकीचे बास्टियन रेस्टॉरंट देखील बंद झाले आहे. मग प्रश्न असा निर्माण होतोय की  शहरातील सर्वात मोठ्या खासगी जमीन मालकांपैकी एक असलेल्या नुस्ली वाडियाच्या नियंत्रणाखाली मध्य मुंबईतील या प्रमुख रिअल इस्टेट मालमत्तेवर नेमकं काय घडत आहे?

सूत्रांनी सांगितले की 18 एकर मालमत्ता जपानी समूह सुमिटोमोला मुंबईतील सर्वात मोठ्या जमिनीच्या व्यवहारात विकली जात आहे. काही वर्षांपूर्वी, ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटने हिरानंदानी समूहाची कार्यालये आणि पवईतील किरकोळ जागा 6,700 कोटी रुपयांना विकत घेतली होती, परंतु ब्रुकफील्ड करार पूर्ण इमारतींसाठी होता, तर वाडिया करार हा रिकाम्या जागेसाठी होता. वाडिया समूहाकडून अद्याप काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Biggest land deal in Mumbai Bombay Dinings 18 acre land sale for 5000 crores

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात