सध्या बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. लवकरच बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील विजेता जाहीर होणार आहेत. Bigg Boss Marathi 3: Mahesh Manjrekar quits Bigg Boss Marathi program due to ‘this’ reason
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छोट्या पडद्यावरील भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो बिग बॉस 3.सध्या बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. लवकरच बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील विजेता जाहीर होणार आहेत.बिग बॉस 3 चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत होते.
परंतु या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ‘महेश मांजरेकर’ यांनी या शो मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.नुकतच बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन राऊंड पार पडला. यावेळी बिग बॉसच्या चावडीदरम्यान महेश मांजरेकर दिसले नाहीत.मांजरेकर यांच्याजागी आता अभिनेता सिद्धार्थ जाधव हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावताना दिसले होते.
महेश मांजरेकर यांनी कार्यक्रम सोड्यांच कारण सांगितलं की , आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी हा कार्यक्रम सोडला आहे. सध्या त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ जाधव यांच्यावर बिग बॉस मराठी 3 कार्यक्रमाची जबाबदारी आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App