जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!

Bhutto family

नाशिक : जसा आजोबा तसाच नातू; दोघांच्याही धमक्यात तद्दन फालतू!!, असलाच पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा राजकीय व्यवहार राहिलाय. आजोबाने जशी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती, तशीच त्याच्या नातवाने भारताला सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. पण त्याचा आजोबा भारताचा कुठलाच केसही वाकडा करू शकला नाही, उलट त्या आजोबालाच भारतात येऊन भारतीय नेत्यांसमोर नाक घासावे लागले. त्यापेक्षा त्या आजोबाच्या नातवाची अवस्था वेगळी होण्याची शक्यता नाही.Bhutto family has habit two threaten India time and again, but they failed miserably

ही कहाणी आहे, पाकिस्तानचा माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो आणि त्याचा नातू बिलावल भुट्टो झरदारी या दोन दिवट्यांची. हे दोघेही पाकिस्तानचे राज्यकर्ते भारताला धमकी देण्यात पुढे आणि प्रत्यक्ष लढाईच्या वेळी शेपूट घालून मागे, हा यांचा इतिहास आणि वर्तमान राहिलेय.



भारताने 1971 चे युद्ध जिंकल्यानंतर जुल्फीकार अली भुट्टो याने भारतात येऊन भारताबरोबर शिमला करार केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापुढे नाक घासले होते. इंदिरा गांधींनी उदारमताने शिमला करार केला नसता, तर भारताच्या ताब्यातले पाकिस्तानचे 93 हजार कैदी जुल्फीकार अली भुट्टो किंवा त्याचा मरहूम बाप शहानवाज भुट्टो यांनाही सोडवता आले नसते. पण इंदिरा गांधींनी शिमला करार करून पाकिस्तानचे 93 हजार कैदी बिनशर्त वापस केले. भारतीय सैन्याने पराक्रमाने जिंकलेली पाकिस्तानची भूमी देखील वापस केली.

त्यानंतर 1974 मध्ये इंदिरा गांधींनी अणुस्फोट करायचा निर्णय घेऊन भारताला अणुशक्ती बनविले. बड्या शक्तिशाली राष्ट्रांच्या पंगतीत भारताचा समावेश केला. त्यावेळी हाच जुल्फीकार अली भुट्टो आम्ही पाकिस्तानी गवत खाऊ, पण अणुबॉम्ब बनवूच, असे म्हणाला होता. प्रत्यक्षात पाकिस्तानला चीन आणि अमेरिकेकडून भीक मागून अणुबॉम्ब मिळवावा लागला होता.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर या जुल्फीकार अली भुट्टोचा नातू बिलावल भुट्टो झरदारी याने भारताला सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहायची धमकी दिली. भारताने सिंधू जल करार पाळला नाही किंवा त्याच्या वरची स्थगिती उठवली नाही, तर सिंधू नदीत पाणी वाहण्याच्या ऐवजी भारतीयांचे रक्त वाहील, अशी धमकी बिलावल भुट्टोने त्याच्या खरबरीत आवाजात दिली. पण या धमकीने भारतातला ससा देखील घाबरला नाही.

बिलावल भुट्टोचा आजोबा पाकिस्तानचा पंतप्रधान होता. बिलावल भुट्टोची आई बेनझीर भुट्टो पाकिस्तानची पंतप्रधान होती. बिलावल भुट्टो झरदारी हा पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री होता. पण या तिघांच्याही अंगात राजनैतिक सभ्यता नव्हती आणि नाही. तिघांचीही सवय आक्रस्ताळी भाषणे करायची आणि पोकळ धमक्यांची राहिली. पण बिलावलचा आजोबा आणि त्याची आई हे दोघेही तो भारताचे काही वाकडे करू शकले नाहीत, तर हा केवळ पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री राहिलेला पप्पू बिलावल भुट्टो झरदारी भारताचा कुठलातरी केस वाकडा करू शकेल का??, या सवालाचे उत्तर सहज कुणीही शेंबडा पोरगा देण्यासारखे आहे.

Bhutto family has habit two threaten India time and again, but they failed miserably

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात