प्रतिनिधी
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि अन्य मागण्यांवर ठाकरे – पवार सरकार मधील मराठा मंत्र्यांनीच मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यांना मंत्री पदावर राहण्याचा जराही हक्क नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर पदावर राहूच नये, अशी मराठा समाजाची भावना आहे, अशा तिखट शब्दात भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे.Betrayal of the society by the Maratha ministers, they have no right to remain as ministers; Radhakrishna Vikhe Patil’s attack
राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाला विखे पाटील यांनी आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजामध्ये अस्वस्थता आहे. खासदार संभाजी छत्रपती यांना दिलेली आश्वासने राज्य सरकारने पूर्ण केली नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली. मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,अशी टीका विखे पाटील यांनी केली. मराठा मंत्र्यांना समाजात तोंड दाखवायला त्यांना जागा नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे देवून समाजाच्या प्रश्नासोबत आहोत हे दाखवून द्यायला हवे, असे ते म्हणाले.
शिवसेनेने मराठी माणसाच्या भावनेच्या आधारावर त्यांनी सत्ता मिळवली. तोच मराठी माणुस पूर्णपणे उद्धवस्त आणि निराधार झालाय मराठी माणसाच्या स्थितीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
अजित पवार बेजबाबदार विधाने करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांच्या विधानाचा निषेधच आहे. नैतिकता शिल्लक नसल्याने ते बेजाबदार विधाने करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळातच राहू नये, अशी मराठी समाजाची भावना झाली असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App