UKRAIN TO INDIA : युद्धभूमी ते मातृभूमी ! भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आले तिसरे विमान…आज रात्री येणार आणखी एक विमानयुक्रेनमध्ये Russia Ukrain War अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले.


युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यास काल रात्री सुरुवात झाली , पालकांच्या चेहऱ्यावर समाधान.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं मायदेशी आगमन सुरु झालं आहे.शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता 219 विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान मुंबईत दाखल झालं. आपल्या मायदेशी दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान दिसत होतं. रविवारी पहाटे, रोमानियातील बुडापेस्टहून एअर इंडियाचे विमान भारतीय प्रवाशांना घेऊन दिल्लीला पोहोचले. या विमानात 250 भारतीय नागरिक होते. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. UKRAIN TO INDIA: Battlefield to Motherland! The third plane from Budapest carrying 250 Indian nationals …

यापूर्वी शनिवारी एअर इंडियाचे विमान बुडापेस्टहून प्रवाशांना घेऊन मुंबईत पोहोचले. आणखी दोन विमान बुडापेस्टहून भारतीय नागरिकांना आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एक विमान आज रात्री उशिरा असेल, तर दुसरे विमान उद्या संध्याकाळी भारतासाठी रवाना होईल.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तर, मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे मायदेशी परतल्याचा आनंद युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढत आहे. युद्धाच्या चौथ्या दिवशीही सतत हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जवळपास १६ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

शनिवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत सरकारने भारतीयांना बाहेर काढण्यासाठी या मिशनला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे.

 

यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी रशियाने लष्करी कारवाईला सुरुवात केल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव घेतला. परंतू यातून आपल्या मायदेशी दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विद्यार्थ्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं.

UKRAIN TO INDIA: Battlefield to Motherland! The third plane from Budapest carrying 250 Indian nationals …

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती