प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या समाजातला एक पुत्र म्हणून, समाजातला एक रक्तामासाचा माणूस म्हणून आम्ही सारे जण तुमच्यासोबत आहोत. या आंदोलनाला जे जे काही सहकार्य लागेल, मदत लागेल, त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. ३ मार्चला विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही ताकदीने घेऊ, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदान येथे मराठा समाज आंदोलकांना दिला.Let’s force Thackeray-Pawar government to accept the demands of Maratha community !!; Determination of Praveen Darekar
सरकारला भाग पाडू
दरेकर यांनी संभाजीराजे छत्रपती यांचे आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठीच्या आमरण उपोषणाला उपस्थित राहून त्यांच्याशी चर्चा केली. तसेच येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. त्याप्रसंगी दरेकर बोलत होते.
मराठा समाजाच्या सदैव पाठीशी
संयोजकांनी सांगितले, उपोषणात राजकारण आणू नका. पहिले आपल्या राजकारणाचे चष्मे सगळ्यांनी बाजूला काढा. जोपर्यंत राजकारण नव्हते तोपर्यंत आपण महाराष्ट्रात मोर्चे बघितले, १०० टक्के यशस्वी झाले, लाखोंचे यशस्वी झाले. ज्या वेळेला छोटी-छोटी स्वतंत्र दुकाने आपण मांडली त्या वेळेला आंदोलनाचे वाटोळे झाले. त्यामुळे आधीच आपण चष्म्यातून पाहू नये. मी काही भाजपचा झेंडा घेऊन आलेलो नाही. तुम्ही सगळ्या पक्षांना जमवा, सगळ्या नेत्यांना जमवा. आम्ही भूमिपुत्र आहोत. तुमच्याच रक्तामांसाचे आहोत. मला वाटते, आता आपल्याला आंदोलनाचे चांगले स्वरूप प्राप्त होऊ शकते. कारण आंदोलनालाही नेतृत्व लागते, वलय लागते, विश्वास लागतो. त्यामुळे माझ्या संपर्कात मराठा समाजाचे सर्व जण आहेत. मी पहिल्या दिवसापासून या आंदोलनात आहे. १० लोक मराठा समाजाची बसली तरी मी भेटत होतो, बोलत होतो. सरकारशी समन्वय साधत होतो. तेव्हा मी राजकारण करायला आलो नव्हतो. जे राजकारण करत नाहीत त्यांच्या समोर तरी असे बोलत जाऊ नका. आता आंदोलन एकोप्याने, एकत्रितपणे करा. नेतृत्व राजे करत आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या संघटना आहेत, त्या करत आहेत. कारण सगळ्यांचा उद्देश आपल्याला आरक्षण मिळावे, आपल्याला न्याय्य हक्क मिळावा हा आहे. त्यामुळे एकमुखाने, एका आवाजात सहभाग घेतला पाहिजे. राजेंना आमचा पाठिंबा आहे.आपल्याला आवश्यकता असेल, तर आम्ही या आंदोलनात जोडले जाऊ, नसेल तरीही मराठा समाजासाठी जे जे काय करायचेय ते आम्ही करत असतो, करत राहू, असं दरेकर पुढे म्हणाले.
राजकारणाचे बळी पडू नका
एसटीचे आंदोलनही याच ठिकाणी झाले होते. मी पहिल्या दिवसापासून या आंदोलनात होतो. कष्टकरी जे जे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज मराठा समाजाला फक्त नावाला मोठा समाज म्हणून पहिले जाते. परंतु आजही शेतकरी असेल, कामगार असेल आजही आमच्या मुलांची शिक्षणाबाबतीत काय अवस्था आहे, यावर एक असंतोष बाहेर आला आणि महाराष्ट्रभर एक मोठे आंदोलन उभे राहिले. आंदोलन संपले का, मराठा संघटना थांबल्या का, असे सगळ्यांना वाटले. वेगवेगळ्या संघटनांचे मराठा नेते आपापल्या परीने न्याय मिळाला पाहिजे म्हणून, प्रामाणिक प्रयत्न करत होते. पण त्यांची एक वज्रमूठ बांधण्याची आवश्यकता होती, ती होत नव्हती. आपल्यामध्येच राजकारणाने शिरकाव केला आणि आपण राजकारणाचे बळी पडलो. म्हणून कोणीही राजकारणाचे बळी पडू नका.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App