पावसाळ्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्या; कोविड आणि पीडियाट्रिक टास्क फोर्सचा सल्ला

वृत्तसंस्था

मुंबई : पावसाळ्यापूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी, असा सल्ला कोविड आणि पीडियाट्रिक टास्क फोर्सने राज्य सरकारला नुकताच दिला. या सूचनेवर राज्य विचार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. Before rainy season all children should be given Influenza Vaccine ; Covid and Pediatric Task Force Advice

इन्फ्लूएन्झाची लस मुलांना दिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. रुग्णालयांवर ताण कमी होऊन अनावश्यक चाचणी रोखण्यास मदत होईल, असं डॉक्टरांनी म्हटलं.



‘इन्फ्लूएन्झा ए’चे दोन उपप्रकार आणि इन्फ्लूएन्झा बीचे दोन उपप्रकार असतात. या लसीचे डोस बाजारात उपलब्ध आहेत. एका डोसची किंमत 1,500 ते 2,000 रुपये आहे.

राज्याच्या कोविड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, ” इन्फ्लूएन्झा लस तातडीने मुलांना द्यावी. ही लस महाग असल्याने बहुतांश मध्यम आणि उच्चवर्गीयांना परवडणारी आहे.

किमान पुढील सहा महिन्यांत प्रत्येक मुलाला ही लस देण्याबाबत किंवा लसीची किंमत कमी करण्याचा विचार करायला हवा.”पीडियाट्रिक टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू म्हणाले, “किमान या वर्षी तरी राज्याने अपवाद वगळून सर्वांना लस द्यावी.”

या सूचनेवर राज्य विचार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. “तथापि, लक्षणविरहीत कोविड पॉझिटिव्ह मूल लस घेऊ शकतं की नाही याबद्दल अधिक स्पष्टता हवी. याबाबत टास्कफोर्सने मार्गदर्शन करावं,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

Before rainy season all children should be given Influenza Vaccine ; Covid and Pediatric Task Force Advice

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात