Beed बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच दुर्दैवी मृत्यू; आढावा घेताना चक्कर येऊन पडले

Beed

प्रतिनिधी

बीड : बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Independent candidate dies at polling station in Beed

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संदीप क्षीरसागर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने योगेश क्षीरसागर हे तगडे उमेदवार मैदानात आहेत. या व्यतिरिक्त डॉ. ज्योती मेटे या देखील या निवडणुकीत आव्हान देत आहेत. याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून बाळासाहेब शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.


बखर लाईव्हच्या वृत्ताची दखल, क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांचे पाच प्रश्न


आज रोजी होत असलेल्या मतदानाच्या दिवशी बाळसाहेब शिंदे हे मतदान केंद्राचा आढावा घेत होते. यासाठीच ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. मात्र या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना बीड शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

साताऱ्यात मतदान करताना मतदात्याचा मृत्यू

दुसरीकडे सातारा जिल्ह्यात देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदान करतानाच एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. खंडाळा येथील मोरवे गावात ही घटना घडली असून श्याम धायगुडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते 67 वर्षांचे होते.

Independent candidate dies at polling station in Beed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात