विशेष प्रतिनिधी
मुंबई : congress भाजपने महाराष्ट्रातल्या प्रचारात भर दिलेला बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा मान्य नसेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे, असा सल्ला वरिष्ठ काँग्रेस नेत्याने दिला, पण त्यातून त्यांनी महायुतीत सुरुंग पेरणी करण्यापेक्षा पवारांच्याच “मनातल्या मुख्यमंत्र्याला” काटशह दिला. महायुतीतल्या मतभेदांच्या बाऊ करत प्रत्यक्षात महाविकास आघाडीतच त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली.Balasaheb thorat urges ajit pawar to leave mahayuti
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूक प्रचार करताना बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यावर भर दिला. हरियाणामध्ये हिंदू एकजुटीमुळे पुन्हा भाजप सत्तेवर आला. तशीच हिंदूंची एकजूट महाराष्ट्रात साधायची असल्याने योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा झंझावाती दौरा महाराष्ट्रात झाला. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळा सूर लावला महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंग चालणार नाही, असा दावा केला.
त्यावरूनच काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडायचे आवाहन केले. अजितदादांना जर बटेंगे तो कटेंगे मान्य नसेल, तर त्यांनी महायुतीत कशाला राहावे??, नुसता तोंडी विरोध करून चालणार नाही, तर महायुतीतून बाहेर पडून त्यांनी विरोध करावा, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
हे तेच बाळासाहेब थोरात आहेत, ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचे सूत्रे आली पाहिजेत, असे शरद पवार त्यांच्यासमोरच म्हणाले होते. परंतु, नंतर पवारांनी महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या नावाभोवती चर्चा सुरू झाली. काँग्रेसच्या “भावी” मुख्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. शरद पवार जर आपल्या मनातल्या व्यक्तीला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त करणार असतील, तर काँग्रेसने महाविकास आघाडी सत्तेवर येण्यासाठी कासोशीने प्रयत्न करून काँग्रेसचा फायदा काय होणार??, असा सवाल तयार झाला.
त्यामुळे पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्याला अडथळा ठरू शकेल, अशी व्यक्ती म्हणजेच अजित पवार. मग त्या व्यक्तीलाच महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीत यायचे निमंत्रण दिले की काँग्रेसचे काम होईल, अशी अटकळ बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याने बांधली असल्यास त्यात नवल नाही. त्यातूनच त्यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेच्या निमित्ताने अजितदादांना महायुतीतून बाहेर पडायचा सल्ला देऊन शरद पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्याला परस्पर काटशह दिला!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App