बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा मुद्दा पेटला; महिलांचे रस्त्यावर आंदोलन, पोलिसांची रोखली गाडी

प्रतिनिधी

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडत पोलिसांची गाडी अडवली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी सर्वेक्षण करू दिले जाणार नाही यावर ग्रामस्थ ठाम असल्याने हा वाद पेटण्याची शक्यता आहे.Barsu refinery survey issue flares up; Women’s protest on the streets, the police stopped the car

सर्वेक्षणाला विरोध 

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण सुरू आहे. यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.



ग्रामस्थ आक्रमक 

सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतरही स्थानिक आंदोलनावर ठाम आहेत. पोलिसांनी सोमवारी आंदोलकांना घरी पाठवले होते मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे ती जागा अद्याप आंदोलकांनी सोडलेली नाही. दरम्यान पोलिसांनी मंगळवारी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू झाल्यावर मंगळवारीही जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

Barsu refinery survey issue flares up; Women’s protest on the streets, the police stopped the car

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात