प्रतिनिधी
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.Important News for Farmers E-Panchnama from June, will get immediate help; Satellite-drone will be used for surveying
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, येणाऱ्या काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने आणि तातडीने मदत मिळावी याकरिता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना आणण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी, गारपीट आणि अवर्षण अशा असंख्य समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी माहिती आधुनिक तंत्रज्ञानाची मदत या वर्षापासून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली असून आता एसडीआरएफच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता 3 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. आपले शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे. जून महिना सुरू झाला की वीज पडून होणारे मृत्यू आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू हे सर्व टाळण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ती खबरदारी आपल्या विभाग आणि जिल्हयांमध्ये घ्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
ते पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांत वातावरणात वाढलेली तीव्र उष्णता, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे होत असेलेल नुकसान हे अत्यंत महत्वाचे विषया आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.मदत व पुनर्वसन विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत.येणाऱ्या काळातही आपण सर्वांनी दक्ष राहून आवश्यक ती खबरदारी घेऊन आपले काम जवाबदारीने करावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दिवसभर चालणाऱ्या या राज्यस्तरीय परिषदेत महत्त्वाचे विषय तसेच फ्लॅगशिप योजनांवर विचारमंथन करण्यात आले. उष्णतेची लाट, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्रधानमंत्री कृषि सन्मान योजना 2.0, जलयुक्त शिवार, ई-ऑफिस, आकांक्षित शहरे आदी विषयांवर सादरीकरण करण्यात येऊन चर्चा करण्यात येणार आहे. याच परिषदेत मिशन-2025 अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 चे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App