विशेष प्रतिनिधी
मुंबई : Balasaheb Thorat काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे किंवा रश्मी ठाकरे चालणार आहेत. त्यांनी तसे वक्तव्य करून काँग्रेसमध्येच राजकीय धुळवड उडवून दिली. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद नाकारून काँग्रेसने शिवसेनेच्या नाड्या आवळल्या. ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री या फॉर्मुल्यासाठी काँग्रेस आग्रही राहिली, पण वर्षा गायकवाड यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे घेऊन त्यामध्ये खोडा घातला. त्यामुळे आता काँग्रेसचे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना डॅमेज कंट्रोल साठी पुढे यावे लागले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद काँग्रेस यांचे मुख्यमंत्री पदावरचे दावे खोडून काढले. Balasaheb Thorat
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने अनेकदा केली. मात्र, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील नेत्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आणि काँग्रेसला आवाहन करत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठींबा देतो, असं म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर आता काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. बाळासाहेब थोरात यांच्या वरिष्ठ नेत्यानेच थेट मुख्यमंत्रीपदाचे वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला चाप बसला आहे. Balasaheb Thorat
Donald Trump : मोदींचा अमेरिकेतही जलवा; डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारादरम्यान म्हणाले…
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हा निहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले, “येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगलं काम करण्याचं आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. Balasaheb Thorat
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असे अनेकदा बोलून दाखवले होते. एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे कोणी उमेदवार असेल तर तो त्यांनी सांगावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोणीही नसल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. दरम्यान, यानंतर आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असं विधान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more