कोरोनाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास बजाज ऑटो देणार दोन वर्षांचा पगार

देशातील नामांकित उद्योगसमूह बजाज ग्रुपच्या बजाज ऑ टो लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दोन वषार्साठी कंपनीकडून पगार दिला जाईल. याशिवाय, या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील करण्याचा निर्णय बजाज ऑटो कंपनीने घेतला आहे. Bajaj Auto will pay two years salary in case of death of Corona employee


प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील नामांकित उद्योगसमूह बजाज ग्रुपच्या बजाज ऑ टो लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दोन वषार्साठी कंपनीकडून पगार दिला जाईल. याशिवाय, या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील करण्याचा निर्णय बजाज ऑटो कंपनीने घेतला आहे.

पुण्यातील कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने दिलेला वैद्यकीय विमा देखील पाच वर्षांसाठी वाढविण्यात येईल. बजाज ऑटोने देऊ केलेल्या इतर जीवन विम्याच्या फायद्यांपेक्षा हे फायदे जास्त आहेत.



बजाज ऑटोने असे म्हटले आहे की, सहाय्य धोरणाअंतर्गत 24 महिन्यांपर्यंत दरमहा मासिक वेतनाची भरपाई ( 2 लाख रुपयांपर्यंत), जास्तीत जास्त दोन मुलांसाठी बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रति मुल वषार्काठी 1 लाख रुपयांची मदत आणि पदवीसाठी प्रत्येक वषार्साठी 5 लाख रुपये शैक्षणिक मदत दिली जाईल.

बजाज ऑ टोने म्हटले आहे की, हा मदत निधी 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. ज्यांचा मृत्यू गेल्या वर्षी झाला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना विविध उपाययोजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून सतत पाठिंबा देत राहू. ही मदत केवळ लसीकरण केंद्र यापुरती मर्यादित नाही तर कोविड केअर सर्व्हिस, अ‍ॅक्टिव्ह टेस्टिंग आणि हॉस्पिटलायझेशनसाठीही मदत केली जात आहे, असे बजाज ऑटोच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

Bajaj Auto will pay two years salary in case of death of Corona employee

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात