विशेष प्रतिनिधी
पुणे : बाई पण भारी देवा या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाने मराठी मनोरंजन चित्रपट विश्वाला आलेलं मळक दूर करत चैतन्याची आणि आशेची नवी किनार या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांना दणकावून कमाई केली आहे. पाच कोटी तयार झालेल्या या सिनेमाने 50 कोटीपर्यंत मजल मारली आहे. सर्व स्तरातून कलाकार प्रेक्षक या सिनेमाचा भरभरून कौतुक करताना दिसतात. Bai pn Bhari Deva Marathi movie
केवळ शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातल्या महिलांनी देखील या सिनेमाला डोक्यावर घेतलं आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील या सिनेमांचे विविध शो महिला एन्जॉय करताना दिसतात. पूर्वी नाटक पाहिला जाणं हा सगळा असायचा अगदी त्याप्रमाणेच नटून थटून महिलावर्ग या सिनेमासाठी बाहेर पडतोय आणि बाई पण एन्जॉय करताना दिसतोय.
सगळं असताना आता या चित्रपटाची सगळी टीम विविध माध्यमातून चित्रपटाची प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून उलगडून सांगतायत. याच मुलाखतीदरम्यान रोहिणी हट्टंगडी यांच्या नवऱ्याची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या कास्टिंग चा किस्सा दिग्दर्शक केदार शिंदे आणि नुकताच सांगितला.
View this post on Instagram A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)
A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)
कुठलीही चित्रपटाची पार्श्वभूमी नसताना सतीश जोशी यांना हा सिनेमा कसा मिळाला त्याचा एक मजेशीर कसा आहे.
चित्रपटासाठी केदार शिंदे आणि अजित भुरे लोकेशन बघण्यासाठी गेले असता ज्या ज्या सदगृहस्थाने हसत हसत दार उघडलं त्या सतीश जोशी यांच्याकडे बघत केदार शिंदेनी त्या क्षणीच रोहिणी ताईच्या यजमानांचा रोल यांच्यासाठी योग्य वाटतो असं म्हंटल. त्यावर अजित म्हणाला, अरे ते कुठलेही कलाकार नाहीये त्यांनी या आगोदर त्यांनी अभिनय केला नाहीय कसं जमेल? तरीही केदार त्यावर ठाम होता.
सतीश जोशी यांना त्या भूमिकेबद्दल विचारल्यावर त्यांना आनंद झाला आणि ते काम करण्यास तयार झाले.केदारच्या दिग्दर्शना खाली ती भूमिका ते अगदीच समरसून जगले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App