दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदींशी बाबासाहेबांची अविस्मरणीय भेट!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत 7 लोक कल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दि. २२ ऑगस्ट २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट झाली होती. श्रीमंत बाबासाहेबांनी पंतप्रधानांना भवानीदेवीची कवड्यांची माळ, शाल आणि शाही पगडी भेट म्हणून बहाल केली होती.Babasaheb’s unforgettable meeting with Narendra Modi at the Prime Minister’s residence in Delhi !!

या प्रसंगाचं वर्णन करताना पंतप्रधानांनी, “बाबासाहेबांना अनेक वर्षे ओळखणे हे माझ्याकरिता मानाचं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्राच्या संबंधाने अनेक तरुणांना, किंबहुना अनेक पिढ्यांना अनुकरणीय असेच आहेत” अशा सार्थ शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र बाबासाहेबांनी आपल्या रसाळ वाणीने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. मनामनांत राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांचा गौरव केला होता. बाबासाहेबांच्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन संवाद देखील साधला होता. आपल्या तरुण वयात बाबासाहेबांच्या मुखातून प्रत्यक्ष शिवचरित्र ऐकल्याची आठवण मोदींनी यावेळी सांगितली होती.

Babasaheb’s unforgettable meeting with Narendra Modi at the Prime Minister’s residence in Delhi !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub