विशेष प्रतिनिधी
नाशिक : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्यावर भाष्य करण्यास मी जाणकार नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. Babasaheb spent his life for the history of Chhatrapati Shivaji Maharaj, but there are some controversial issues in it, tribute to Sharad Pawar
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी निधन झाले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते देशभरातून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार म्हणाले की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाबाबत आस्था निर्माण करण्यात योगदान दिले. ते आपण विसरू शकत नाही. त्यांनी शिवरायांच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातले. बाबासाहेबांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्या संदर्भात भाष्य करण्यास मी जाणकार नाही. त्या संदर्भातला मी तज्ज्ञ नाही. पण त्यांनी एक मोठी कामगिरी केली. शिवछत्रपतींच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातले. मात्र त्यांच्याबद्दल काहींनी बदनामी केली. जे अनेकांच्या बाबतीत घडले ते त्यांच्या बाबतही घडले असावे. त्यात उणीव काढण्याचा प्रयत्न काही जण करत असतात. ते ही त्यांच्या बाबतीत घडले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काम पुढे घेऊन जाण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांची बदनामी केली गेली. हे सगळे खरे असले तरी इतिहासाच्या संदर्भात आस्था निर्माण करण्याचे त्यांचे योगदान आपण विसरू शकत नाही. त्यांचे कार्य पुढे कसे सुरू रहावे, यावर मी भाष्य करणार नाही. यात वेगवेगळी मते आहेत. मला यात पडायचे नाही.
शरद पवार पुढे म्हणाले की, पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास सांगून, जनजागृती केली. त्यांनी शेकडो व्याख्याने घेतली. नव्या पिढीत याबाबत आस्था निर्माण केली, असे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत. ते दीर्घायुषी होते. वयाची शंभरी लोकांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पार पाडली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App