या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.Baba Siddiqui
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Baba Siddiqui राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या नऊ झाली आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, विशिष्ट माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेने शुक्रवारी शेजारच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जत येथे छापे टाकले. यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.Baba Siddiqui
Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियावर EDची पकड, HPZ ॲप घोटाळ्यात चौकशी सुरू
या आरोपींना अटक करण्यात आली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नितीन सप्रे यास डोंबिवलीतून, रामफुलचंद कनोजियाला पनवेलमधून, संभाजी किशोर पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे आणि चेतन पारधी यांना अंबरनाथ परिसरातून अटक करण्यात आली आहे. नितीन सप्रे हा मुख्य सूत्रधार शुभम लोणकरच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बहराइचचे शुटर शिवकुमार आणि धर्मराज कुर्ल्यातील भाड्याच्या घरात जाण्यापूर्वी कर्जतमध्ये एका खोलीत राहिले.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी अटक करण्यात आलेले पाचही लोक बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा आरोप असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होते. ते म्हणाले, यानंतर या प्रकरणातील अटकेची एकूण संख्या नऊ झाली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App