विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद – औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरुन राजकारण तापलं असून राजपूत समाजाने पुतळ्याला विरोध करणाऱ्याविरोधात जोरदार आंदोलन केले.Aurangabad Politics heated up on Maharana Pratap statue
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांन एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या वरती मोठी टीका केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात उभारण्यात येणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध केला होता, पुतळा ऐवजी महाराणा प्रताप यांच्या नावाने केंद्रीय शाळा सुरू करावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती.
मात्र यानंतर विविध संघटनेकडून खासदार इम्तियाज जलील यांच्या वर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली तर राजपूत समाजाच्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहे.यासंदर्भात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की. खासदार इम्तियाज जलील यांना महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करण्याचा अधिकारच नाही,
महानगर पालिकेमध्ये हा प्रस्ताव मागेच मंजूर झालेले असून आता फक्त टेंडर करण्याचे बाकी आहे. नेहमी अशा गोष्टींना विरोध करणारे खासदार इम्तियाज जलील यांचा हिंदू विरोधी चेहरा नागरिकांसमोर आल्याची टीका आज खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
औरंगाबाद शहरातील कॅनॉट गार्डन येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याला एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शविला असून या ठिकाणी राजपूत समाजाने एकत्र होऊन आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर इतरत्र या घटनेचे पडसाद उमटले आहे
औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले की महाराणा प्रताप यांचा इतिहास ज्यांना माहित नाही अशांनी विरोध केला आहे .ज्यांच्या घरात भावा भावाचे भांडण संपत्तीसाठी चालतात असे सूर्यासारखे तेज असलेल्या महाराणा प्रताप यांचा इतिहास त्यांना काय माहित.
आणि हा इतिहास विसरता येणार नाही. समाजाकरता कोणासमोर आपले मस्तक झुकवले नाही अशा महाराणा प्रताप यांचा पुतळा होणार कोणी कितीही अडवे आले तरी पुतळा होणारच असे आमदार व जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.
खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात उभारण्यात येणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला माझा विरोध नाही. मात्र पुतळ्यासाठी एक कोटी रुपये खर्च न करता तो खर्च महाराणा प्रताप यांच्या नावाने ग्रामीण भागात सैनिकी शाळा सुरू करण्यात यावी असा विचार मी मांडला आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीला विरोध केल्याने राजपूत समाजाने जलील यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे मोठे पडसाद पडत आहेत. माझा पुतळा उभा करण्याला विरोध नाही, असे स्पष्टीकरण जलील यांनी आज दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App