विशेष प्रतिनिधी
बीड : बीड आगारातील एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळला आहे. बीड येथे संपकरी चालकाने रोगर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या चालकावर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. Attempted suicide of ST driver at Beed depot; Treatment started at the district hospital
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यभर संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप सुरू असल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. काही ठिकाणी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने राज्यभर वातावरण चिघळले आहे. दरम्यान बीड येथे संपकरी अशोक कोकटवार यांनी रोगर पिल्याने खळबळ उडाली असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App