रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी चिकन मटण खा असे वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत असलेले बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार उघडकीस आला.Attempt to burn MLA Sanjay Gaikwad’s vehicle
विशेष प्रतिनिधी
बुलडाणा: रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी चिकन, मटण खा असे वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत असलेले बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार उघडकीस आला.
गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या जुनागाव परिसरातील वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. दोन अज्ञातांनी दुचाकीवर येऊन त्यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संजय गायकवाड यांनी संपर्क साधला आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथकही गायकवाड यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी पाहणी केली आहे.
संजय गायकवाड हे २६ मे रोजी पहाटे दीड वाजता मुंबईवरून बुलडाण्यात आले होते. त्यानंतर पहाटे तीन वाजता वाहन जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या वाहनाच्या इंधनाच्या टाकीजवळचा भाग पेटवून दिला होता.
या वाहनाच्या समोर व मागे ही वाहने उभी होती. आगीचा भडका उडाला असता तर परिसरातील तीन ते चार वाहनेही जळाली असती, असे गायकवाड यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App