देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांचा पलटवार


विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र जीवन मरणाच्या सीमेवर उभा आहे.राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे . रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असताना राजकारण मात्र तुफान तापले आहे.Nitesh Rane Slams Shivsena MLA Sanjay Gaikwad remark over Devendra Fadnavis

बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. संजय गायकवाड यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे यांनी गायकवाड यांना तो प्रयोग प्रथम मुख्यमंत्र्यांवर कर, अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं.

संजय गायकवाडांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आरोप करताना त्यांची भाषा घसरली होती. “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले.
संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”, अशा शब्दात टीका केली आहे.

Nitesh Rane Slams Shivsena MLA Sanjay Gaikwad remark over Devendra Fadnavis

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी