वृत्तसंस्था
पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या संशयावरून अटकेत असलेला लष्कराच्या संशोधन, विकास संस्थेचा (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्जास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने विरोध केला आहे. कुरुलकरला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, तसेच तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधू शकतो, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी शुक्रवारी न्यायालयात केला. कुरुलकरने त्याचे वकील ॲड. ऋषिकेश गानू यांच्यामार्फत न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.ATS opposes Kurulkar’s bail, may contact Pak intelligence again, will check mobile
कुरुलकरच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश एस. व्ही. कचरे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी (२५ ऑगस्ट) एटीएसचे वकील ॲड. फरगडे आणि कुरुलकरचे वकील ॲड. गानू यांनी त्यांचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. कुरुलकर डीआरडीओमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे. त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाब टाकू शकतो. जामीन मंजूर झाल्यास कुरुलकर पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती ॲड. फरगडे यांनी युक्तिवादात केली. कुरुलकरविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुरुलकर याची डीआरडीओच्या समितीकडून चौकशी करण्यात आली होती.
गुजरातच्या प्रयोगशाळेत मोबाइलची तपासणी होणार
कुरुलकरने मोबाइलमधील डाटा नष्ट केला आहे. तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुरुलकरचा मोबाइल संच गुजरातमधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तांत्रिक तपासासाठी पाठवायचा आहे, असे ॲड. फरगडे यांनी युक्तिवादात नमूद केले. एटीएसकडून याबाबतचा अर्ज विशेष न्यायालयात सादर केला. न्यायालयाने एटीएसचा अर्ज दाखल करून मोबाइल तांत्रिक तपासणीसाठी गुजरातला पाठवण्यास परवानगी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more