एटीएमचा वापर आजपासून महागणार, रिझर्व्ह बॅंकेची नवी शुल्कवाढ

विशेष प्रतिनिधी

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवर शुल्कवाढ केली आहे. त्यानुसार मर्यादेपेक्षा अधिक एटीएम व्यवहार केल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. ही शुल्कवाढ आजपासून (ता. १) लागू होईल.ATM charges hiked from today

दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची हीच ठराविक मर्यादा ओलांडल्यास ग्राहकांना यापुढे अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. तसेच बिगरआर्थिक व्यवहारांमध्ये एटीएमवर जाऊन पिन नंबर बदलणे, बँक खात्यातील शिल्लक रक्कमेचा तपशील पाहणे यांचा समावेश होतो.



अशा बिगरआर्थिक व्यवहारांवरही शुल्कवाढ करण्यात आली आहे.आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएममधून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठीचे इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरून १७ रुपये केले आहे. त्याचप्रमाणे बिगरआर्थिक व्यवहारासाठी शुल्क ५ रुपयांवरून ६ रुपये केले आहे.

एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवर इंटरचेंज शुल्क आकारले जाते. म्हणजेच ग्राहकाने आपल्या बँकेव्यतिरिक्त अन्य बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ठराविक शुल्क आकारले जाते.

ATM charges hiked from today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात