विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुनावणीचे वेळापत्रक म्हणजे वेळ काढून पणा नव्हे पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या, अन्यथा आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी आणि कार्यवाही निरर्थक ठरेल, अशा स्पष्ट शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज फटकारले. Assembly Speaker Narvekar was reprimanded by the Supreme Court
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातल्या अर्जावर सरन्यायाधी धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्द वापरले. विधानसभा अध्यक्ष यांनी वेळापत्रक सादर केले पण वेळापत्रक सादर करणे म्हणजे वेळ काढूपणा करणे नव्हे त्यांनी योग्य वेळेत सुनावणी घेतली नाही तर अर्जदारांचे म्हणणे खरे ठरेल. त्यामुळे पुढच्या निवडणुका होण्याआधी आमदारांच्या अपात्रते संदर्भातला निर्णय घ्या अन्यथा ती सुनावणी आणि कार्यवाही दोन्ही निरर्थक ठरेल असा स्पष्ट इशारा धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने नोटीस काढल्या. आदेश काढला. तरीही विधानसभा अध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही, अशी तीव्र नाराजी ही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली.
आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड याच्या नेतृत्वाखालील तीन न्यायामूर्तींच्या खंडपीठा समोर ही सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महाधिवक्ता तुषार मेहता यांचे सुनावले. 14 जुलैमध्ये आम्ही नोटीस काढली. सप्टेंबरमध्ये आदेश काढला. पण विधानसभा अध्यक्षांनी काहीच केले नाही. विधानसभा अध्यक्षांनी जूनपासून काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता त्यांनी पुढील निवडणुकीच्या आधी निर्णय घ्यावा. नाही तर आम्हाला एक आदेश काढावा लागेल, अशा शब्दात कोर्टाने अध्यक्षांचे कान टोचले. तसेच निवडणुकीच्या आधी निर्णय झाला नाही तर विधानसभा अध्यक्षांपुढील कार्यवाही निरर्थक ठरेल, असंही कोर्टाने म्हटलं.
राहुल नार्वेकर – रामराजे : जावई झाले विधानसभा अध्यक्ष; आता सासरे विधान परिषद सभापती राहतील??
आम्ही आदेश देऊ शकतो
सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलू शकत नाही. आदेशाचे पालन करावच लागेल हे कुणी तरी विधानसभा अध्यक्षांना सांगितलं पाहिजे, असं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपद घटनात्मकपद असलं तरी आम्ही आदेश देऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं आहे. अपात्रतेचं प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे. विधनसभा अध्यक्षांनी आतापर्यंत निर्णय घेतला नाही. निवडणुकांआधी निर्णय घेतला नाही तर अध्यक्षांसमोरील कार्यवाही निरर्थक ठरेल, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
तर आम्ही आदेश देऊ
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेची सुनावणी मंगळवारी ठेवली आहे. यावेळी त्यांनी मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या. विधानसभा अध्यक्ष आणि महाधिवक्त्यांनी या संदर्भातील वेळापत्रक तयार करून कोर्टाला द्यावं. मंगळवारपर्यंत वेळापत्रक न दिल्यास आम्ही आदेश देऊ, असंही कोर्टाने बजावलं आहे. यावेळी तुषार मेहता यांनी सोमवारपर्यंत वेळ मागितला. तर सोमवारपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडून माहिती घेऊन कळवा. एनसीपीच्या सुनावणीचं वेळापत्रकही मंगळवारपर्यंत द्या, असे आदेशही सरन्यायाधीशांनी दिले.
राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत. ते विधान परिषदेचे माजी सभापती अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीतून ते भाजपमध्ये आले. भाजपने त्यांना आमदारकीचे तिकीट दिले आणि शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकरांना भाजपने विधानसभेचे अध्यक्ष केले. दोन पक्षांच्या दोन राजकीय पक्षांचा प्रवास करून आलेल्या या नेत्याकडे भाजपने विधानसभेचे अध्यक्षपद सोपविले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App