Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचे 200 कोटींचे ‘बेनामी’ साम्राज्य; पाथर्डीत 150 कोटींची जमीन, आलिशान फार्महाऊस, बेकायदेशीर संपत्ती उघड

Ashok Kharat

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ashok Kharat अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीचे आणि बड्या ओळखींचे धागेदोरे आता वेगाने समोर येत आहेत. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि उद्योजकांची नियमित ये-जा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असतानाच, आता खरातच्या अफाट मालमत्तेचाही उलगडा झाला आहे. नाशिक आणि शिर्डी परिसरातील शेतजमिनी, प्लॉट्स आणि भागीदारीतील अनेक मालमत्तांची कागदपत्रे तपासयंत्रणांच्या हाती लागली असून, ही संपत्ती त्याने स्वतःच्या कुटुंबीयांच्या आणि नातेवाईकांच्या नावावर दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासामुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांचे आणि बेकायदेशीर साम्राज्याचे धक्कादायक वास्तव आता प्रकाशात येत आहे.Ashok Kharat

महिला अत्याचार प्रकरणातील संशयित अशोक खरात याने अंकशास्त्राच्या नावाखाली सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जमवल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, काही कागदपत्रांनुसार या संपत्तीचा आकडा त्याहूनही मोठा असण्याची शक्यता आहे. या अफाट मालमत्तेत नाशिकच्या गोविंदनगरमधील एक आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, पाथर्डी परिसरातील 30 एकर जमीन, तसेच सिन्नर, ओझर विमानतळ आणि शिर्डी परिसरातील कोट्यवधींच्या जमिनींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.Ashok Kharat



150 कोटी रुपये किमतीची 30 एकर शेतजमीन

अशोक खरातचे सिन्नरमधील मिरगाव येथे आलिशान फार्महाऊस असल्याचे समोर आले आहे. खरातची सर्वाधिक संपत्ती नाशिकमधील पाथर्डी गावात एकवटली असून, या भागात त्याच्या मालकीची 20 हून अधिक ठिकाणी मालमत्ता आहे. ज्यामध्ये बाजारभावानुसार सुमारे 150 कोटी रुपये किमतीची 30 एकर शेतजमीन समाविष्ट आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जमिनींपैकी एक शेतजमीन अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नी प्रिती आणि अशोक खरातची मुलगी तृप्तीबाला यांनी एकत्रितपणे खरेदी केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले असून, यामुळे या प्रकरणाला आता नवीन प्रशासकीय वळण प्राप्त झाले आहे.

पत्नी कल्पनाच्या नावे 273 चौरस मीटरचा भूखंड

पाथर्डी येथील 40 गुंठे जमिनीचा काही हिस्सा अशोक तर उर्वरित भाग पत्नी कल्पना खरात हिच्या नावावर आहे. तसेच याच भागात भाऊ दत्तात्रय खरातच्या नावे 5 एकर आणि मुलगी सृष्टीच्या नावेही जमीन आढळली आहे. नाशिक शहरात पत्नी कल्पनाच्या नावे 273 चौरस मीटरचा भूखंड असून, गोळावणे गावात 2 एकर आणि आडगावमध्येही तिच्याच नावे मालमत्तांची नोंद आहे. याव्यतिरिक्त, विल्होळी गावात सुरेखा दिलीप खरातच्या नावावर एक बिनशेती भूखंड असल्याचे समोर आले असून, खरातच्या या अफाट बेनामी संपत्तीचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे.

शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या नावे 30 गुंठे जमीन

शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या नावे 30 गुंठे जमीन असून, राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथे अशोक खरातच्या नावे एक बिनशेती प्लॉट आहे. तसेच, राहाता तालुक्यातीलच निघोजमध्ये या दोघांच्या नावे 1 हेक्टर 60 गुंठे इतकी मोठी शेतजमीन आढळली आहे. याव्यतिरिक्त, सिन्नरमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी आणि कुंदेवाडीमध्ये तीन ठिकाणी खरात कुटुंबाचे भूखंड असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खरात, त्याची पत्नी, दोन्ही मुली, आई आणि इतर नातेवाईकांच्या नावे एकूण 50 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्याचे समोर आले आहे. ‘कॅप्टन’ पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगण्याचा व्यवसाय आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून त्याने हे अफाट आर्थिक साम्राज्य उभे केल्याचे दिसून येत आहे. ही संपत्ती केवळ आतापर्यंत उघड झालेल्या कागदपत्रांवर आधारित असून, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास या भोंदूबाबाचे आणखी अनेक काळे कारनामे आणि बेनामी संपत्ती उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

200 Crore Benami Empire of ‘Captain’ Ashok Kharat Exposed in Nashik VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात