प्रतिनिधी
नांदेड : Ashok Chavan बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप झाले की लगेच राजीनामा घेण्याची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची भूमिका मांडली आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवत अशा पद्धतीने राजीनामे घेणे हा राजकारणातून उद्धवस्त करण्याचा कार्यक्रम असल्याचा आरोप केला आहे.Ashok Chavan
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गतवर्षी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी बीडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण मुंडे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच योग्य तो निर्णय घेतील असे सांगत त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी उपरोक्त टीका केली आहे.
काँग्रेसमध्ये राजीनामा घेण्याची चुकीची पद्धत
अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. त्यानंतर त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. काँग्रेसची ही पद्धत अत्यंत चुकीची होती. हे माझे मत तेव्हाही होते व आजही आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळेला झाला हे मी सांगू शकतो. राजकारणासाठी कुणाला बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचे सत्र काँग्रेसच्या काळात होते. राजकारणात आरोप होतात, प्रत्यारोप होतात. हा राजकारणाचाच भाग आहे. पण केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही निर्णय घेतले ते चुकीचे होते.
अशोक चव्हाणांना द्यावा लागला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
अशोक चव्हाण यांच्यावर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ‘अशोक पर्व’ नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज दिल्याचा आरोप करण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याचवेळी आदर्श सोसायटी घोटाळाही समोर आला होता. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्याकडून 2010 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. येथूनच अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला गळती लागल्याचे सांगितले जाते.
गतवर्षी भाजपत केला होता प्रवेश
अशोक चव्हाण यांनी गतवर्षी भाजपचे कमळ हाती घेतले. उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले सहकारी अमर राजूरकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थाने नवी सुरुवात झाल्याची भावना व्यक्त केली. आजपासून मी एक नवी सुरुवात करत आहे. यापुढे मी भाजपच्या ध्येयधोरणांनुसार काम करेल. विशेषतः पक्षाचा आदेश व फडणवीस यांचे निर्देश यांच्यानुसार मी वाटचाल करेन, असे ते भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App