विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashish Shelar महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केली आहे. त्यांच्या बदलीची काँग्रेस नेत्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांच्यावरून नाना पटोले फडणवीसांवर बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका मुंबई भाजचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली.Ashish Shelar
रश्मी शुक्ला या स्पष्टपणे भाजपसाठीच काम करत होत्या. त्या विरोधकांचे फोन टॅप करत होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. राज्य सरकारने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना या पदावर बसवले होते. रश्मी शुक्ला यांची या पदावर नियुक्ती झाली तेव्हापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली होती, असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला होता. या आरोपांवर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नाना पटाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
विरोधकांचे फोन टॅप केल्याचे सात दिवसांत पुरावे सादर करावे, अशी नोटीस नाना पटोले यांना पाठवणार आहोत. अन्यथा नाना पटोले यांच्यावर बेछुट, विनापुरावे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
मविआने राजकारणातला सुसंस्कृतपणा आमच्याकडून शिकावा
गोपाळ शेट्टींबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ते आमचे पहिल्या फळीतील नेते आहेत. ते भाजपचे प्रमुख कट्टर आणि कर्मठ कार्यकर्ते आहेत. मुंबईकरांसाठी आणि भाजपसाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी पक्षाचा निर्णय देखील स्वत:चा निर्णय समजून घेतला. राजकारणातला सुसंस्कृतपणा आणि विचारधारेवरचे राजकारण कसे करायचे असते, हे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी आमच्याकडे पाहून शिकावे, असा टोला शेलार यांनी लगावला.
अमित ठाकरेंबाबत आता महायुतीच्या नेत्यांचा निर्णय
भाजपचे अमित ठाकरेंना समर्थन असणार का? यावर बोलताना शेलार म्हणाले, आमची भूमिका देवेंद्र फडणवीस आणि मी आधीच मांडली आहे. अमित ठाकरे यांना महायुतीने समर्थन दिले पाहिजे. महायुतीच्या नेत्यांपुढे आम्ही भूमिका घेऊन गेलो होतो. आता महायुतीचे नेते निर्णय घेतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App