आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दोन तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर लगेचच त्यांची गुवाहाटी येथे बदली करण्यात आली. मात्र, आर्यन प्रकरणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले नसल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.Aryan Khan Drug Case Two NCB officials suspended in Aryan Khan drug case
वृत्तसंस्था
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दोन तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर लगेचच त्यांची गुवाहाटी येथे बदली करण्यात आली. मात्र, आर्यन प्रकरणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले नसल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.
निलंबित अधिकाऱ्यांचे नाव विश्व विजय सिंह असून दुसऱ्याचे नाव आशिष रंजन प्रसाद आहे. विश्व विजय सिंग यांची एनसीबी गुवाहाटी येथे बदली करण्यात आली होती आणि आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आशिष रंजन यांची सीआयएसएफमध्ये बदली करण्यात आली होती आणि आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालाच्या आधारे दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अधिकारी आर्यनच्या तपास पथकात होते, मात्र त्यांना आणखी काही प्रकरणांत निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
2 ऑक्टोबर 2021च्या रात्री NCB ने मुंबई क्रूझवर टाकलेल्या छाप्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर 6 जणांना अटक केली होती. आर्यन खानसोबत एनसीबीने आणखी सात जणांना अटक केली होती. मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट, इस्मित सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सतीजा आणि विक्रांत छोकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अटकेनंतर नवाब मलिक यांनी केले होते गंभीर आरोप
आर्यन खानच्या अटकेनंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणातील कारवाई नियमानुसार झाली नसल्याचा अनेक गंभीर आरोप केला होता. मलिक यांनी याप्रकरणी मध्यस्थांवरही प्रश्न उपस्थित केले होते, त्याचबरोबर एनसीबीवर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App