आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान आहे.त्यामुळे खोतकर दानवेंविरोधात टिका करण्याती कुठलीही संधी सोडत नाही.Arjun Khotkar Future MP, Fixed MP Banners were hoisted all over the fire
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : आगामी काळात शिवसेनेचे जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जालन्यात भावी खासदार लिहिलेले बॅनर लावण्यात आले आहेत.
भावी खासदार, फिक्स खासदार असा वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दानवे-खोतकर संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात फार पूर्वीपासून वाद आहे.तसेच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर दानवेंविरोधात मैदानात उतरले होते.
मात्र त्यावेळी भाजप-शिवसेना युती असल्याने खोतकरांनी माघार घेतली होती.मात्र आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान आहे.त्यामुळे खोतकर दानवेंविरोधात टिका करण्याती कुठलीही संधी सोडत नाही.दरम्यान आगामी काळात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत पाहायला मिळेल. .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App