प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारकडून सध्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना आपल्या पदावरुन पायउतार करण्यात आले आहे. त्यांच्या पदावर आता रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण ते इच्छूक नसल्याने अखेर राज्य सरकारने रजनीश शेठ यांची नियुक्ती केली आहे.Appointment of Rajneesh Sheth as Director General of Police, Maharashtra
रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.
रजनीश यांचा जन्म 29 डिसेंबर 1963 रोजी झाला होता. ते 25 ऑगस्ट 1988 ला पोलिस दलात भरती झाले होते. रजनीश शेठ यांचे शिक्षण बी ए ऑनर्स (एल एल बी) झाले आहे. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही शेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
नुकतीच त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून रजनीश शेठ यांची ओळख आहे. रजनीश शेठ आतापर्यंत कुठल्याच वादात सापडलेले नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App