वृत्तसंस्था
मुंबई : मंदाकिनी खडसे, साहिल खान, समित ठक्कर यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, तरी त्यांच्यासाठी आज मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनाचा दिवस ठरला. Anticipatory bail day today for mandakini khadse, actor sahil khan and sameet thakkar
भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेले नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबई हायकोर्टाने जामीन अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 21 डिसेंबर पर्यंत त्यांना अटक करता येणार नाही. 21 डिसेंबर रोजी त्यांच्या संदर्भात पुन्हा सुनावणी घेतली जाईल, असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर बॉडी बिल्डर समीर पाटील याला धमकावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बॉलीवुड एक्टर साहिल खान याला देखील 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हायकोर्टाने जामीन अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सोशल मीडियावर समीर पाटील विरोधामध्ये कोणतीही पोस्ट अथवा ट्विट करायचे नाही, अशी अट साहिल खानला घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर सोशल मीडिया ॲक्टिव असणारा नागपूरचा समित ठक्कर यास देखील मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कथित बदनामीप्रकरणी त्याला अटक होण्याची शक्यता असल्याने त्याने अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टात केला होता. तो अर्ज हायकोर्टाने मंजूर केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App