पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट मध्ये लोकशाही विरोधी पोस्टर; अभाविपची संतप्त निदर्शने!!

Anti-democracy poster at Gokhale Institute, Pune

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेत लोकशाही विरोधी पोस्टर लावण्यात आले याविषयी पुणेकरांमध्ये प्रचंड संताप उसळला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्या पोस्टर विरोधात संतप्त निदर्शने केली आहेत. Anti-democracy poster at Gokhale Institute, Pune

देशात लोकशाही प्रणालीनुसार निवडणुका होत नसून तुम्ही त्याचा निषेध नोंदवण्यासाठी “नोटा” पर्यायाला मतदान करा, असे आवाहन या पोस्टर मध्ये केले होते. परंतु त्या पोस्टरवर कुणाचेही नाव घालण्याची हिंमत लिबरल्सनी दाखवली नव्हती. लोकशाही विरोधी पोस्टर झळकवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करून परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाचा निषेधही केला.

सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण असताना निवडणूक आयोग आणि अन्य संस्था जास्तीत जास्त मतदान व्हावे. “नोटा” या पर्यायाचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी जागरूकता निर्माण करत आहे. त्या अंतर्गत निवडणूक गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाने डेमोक्रसी वॉलचा बॅनर लावला होता. यावर विद्यार्थ्यांनी लोकशाहीला पूरक मतदान करावे यासाठी मजकूर लिहिण्यासाठी जागा होती.

पण गोखले इन्स्टिट्यूट मधील डाव्या आणि नक्षलवादी विचारांच्या काही विद्यार्थ्यांनी “नोटा” हाच कसा उत्तम पर्याय आहे, या प्रकारचा मजकूर लिहिला. आयोगाच्या नियमावलीनुसार “नोटा” या पर्यायाची जनजागृती कोणीही करू शकत नाही. संबंधित पोस्टरवर निवडणूक आयोग आणि गोखले इन्स्टिट्यूटचा लोगो असून सुद्धा इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यांना शोधून काढून कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही.

पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करावी म्हणून महाविद्यालयाबाहेर निदर्शने केली. त्याचबरोबर या दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत असताना संबंधित पोलीस ठाणे आणि निवडणूक आयोग मध्ये गोखले इन्स्टिट्यूट च्या प्रशासनावर देखील कारवाई व्हावी याकरिता निवेदन दिली.

देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू असताना देखील अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना महाविद्यालयात घडत असून त्यांना पाठीशी घालणारे प्रशासन अत्यंत निर्लज्ज आहे. या प्रशासनाविरुद्ध अभाविप मोठ्या आंदोलन उभे करेल, असा इशारा प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला. शहरी नक्षलवादी विचारसरणीच्या चळवळी या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या संस्थांमध्ये सक्रिय असून विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांची यादी तयार करून देश विरोधी कृत्य घडत आहेत. लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी अभाविपचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हारपुडे यांनी केली.
सदर प्रसिद्धीपत्रक तन्वी खाडीलकर पुणे महानगर कार्यालय मंत्री यांनी प्रसिद्ध केले आहे.

Anti-democracy poster at Gokhale Institute, Pune

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात