
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंतरवली सराटी येथील पोलिसांचा लाठीमार, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर झालेला आरोप, फडणवीसांची माफी आणि त्यानंतर फडणवीस प्रत्यक्षात निर्दोष असल्याचा निर्वाळा हा विषय मराठी माध्यमांमध्ये खूप चर्चिला गेला, पण अंतरवाली सराटीतल्या दगडफेकीचे मात्र सत्य मराठी माध्यमांनी लपवून ठेवले होते, ते ऋषिकेश बेदरे यांच्या अटकेने उघड्यावर आले आहे.Antarwali Sarati??; What is the exact connection between Jarange – Rishikesh Bedre – Pawar??
अंतरवली सराटीतील दगडफेक त्यानंतर झालेला हिंसाचार यावरून 36 संशयतांना आयडेंटिफाय करून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यापैकी ऋषिकेश बेदरे या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली. हा ऋषिकेश बेदरे नेमका कोण आहे?? त्याचे कोणाशी कनेक्शन आहे?? हे हळूहळू उघड झाले.
अंतरवली सराटीतल्या दगडफेकीनंतर ऋषिकेश बेद्रे दोनच दिवसांमध्ये शरद पवारांच्या भेटीला जाऊन आला. त्यावेळी त्याच्या समवेत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील होते. मूळात ऋषिकेश बेदरे हा शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष आहे. तो मूळचा गेवराईचा आहे आणि अंतरवाली सराटीतल्या आंदोलनामध्ये तो मध्येच “उगवलेला” दिसला आहे.
पण ऋषिकेश बेद्रे हा पोलिसांच्या रेकॉर्ड मधला गुन्हेगार आहे. दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, रस्त्यात अडवून लूट, दारू विक्री, जुगार, वाळू तस्करी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय फौजदारी कायद्यातल्या 14 कलमांवर आधारित गुन्हे दाखल आहेत.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) November 26, 2023
असा गुन्हेगारी प्रवृत्तीचा ऋषिकेश बेदरे अंतरवली सराटीतल्या आंदोलनात आला. मनोज जरांगेंना भेटला आणि त्यांच्या आंदोलनात सामील झाला. 1 सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक झाली आणि त्यानंतर ऋषिकेश बेदरे 3 सप्टेंबरला राजेश टोपेंसह जाऊन शरद पवारांना भेटला. हा घटनाक्रम आता उघड झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनातील सर्व घटनाक्रमावरच संशयाचे दाट जाळे निर्माण झाले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ऋषिकेश बेदरे आणि राजेश टोपे यांच्या शरद पवारांच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे.
मनोज जरांगे पाटलांना ऋषिकेश बेदरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती नव्हती का?? असा कळीचा सवाल ही तयार झाला आहे.
शिवाय अजित पवार गटाला धडा शिकवण्यासाठी अंतरवली सराटीतली दगडफेक आणि त्यानंतरची मराठवाड्यातली जाळपोळ करण्यात आली. हा ऋषिकेश बेद्रे हा शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष आहे. याचे त्या सर्व घटनाक्रमाशी कनेक्शन आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्याबद्दल पोलीस कसून चौकशी आणि तपास करीत आहेत.
Antarwali Sarati??; What is the exact connection between Jarange – Rishikesh Bedre – Pawar??
महत्वाच्या बातम्या
- Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झाले ७० टक्के मतदान
- शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!!
- केरळच्या कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरी, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 60 जखमी; वार्षिक सोहळ्यात गर्दीमुळे गोंधळ
- ओटीटी प्लॅटफॉर्मवर लागू होणार सेन्सॉरशिप; यूट्यूबवरील पत्रकार, ब्लॉगर्स वृत्तवाहिन्याही कक्षेत येणार
- पाकिस्तानमध्ये 2 हिंदू मंदिरे पाडली; एक मंदिर युनेस्को वारसा यादीत; न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई