वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार चालकांकडून शंभर कोटींची खंडणी वसूल करण्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी आणि तपासासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे विद्यमान मुख्य सल्लागार सिताराम कुंटे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्याने नोटीस पाठवली होती. आज सीताराम कुंटे चौकशी आणि तपासासाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. Anil deshmukh Moneny laundering; sitaram kunte in ed office
सुमारे दहा दिवसांपूर्वी त्यांना ईडीने चौकशी आणि तपासासाठी नोटीस पाठवली होती. परंतु त्यावेळी मंत्रिमंडळाची बैठक असल्याचे कारण सांगून सीताराम कुंटे हे चौकशीला हजर राहिले नव्हते. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सीताराम कुंटे हे ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले आहेत. त्यांची ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत.
अनिल देशमुख यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणा बरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या यामध्ये कोणते “व्यवहार” झाले आहेत का?, याचा चौकशी आणि तपास देखील ईडीचे अधिकारी करत आहेत. याबाबत सीताराम कुंटे यांची चौकशी सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश कुणी दिले?, त्याची अंमलबजावणी कशी झाली?, हे प्रश्न सीताराम कुंटे यांना विचारण्यात येत असल्याचे समजते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App