सिटी को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळयाच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित यांना ईडीने समन्स बजावले आहे.घरात ईडीकडून छापे सुरू असताना आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Anandrao Adsul’s health deteriorates after ED notice, Rs 980 crore scam in City Co-operative Bank
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिटी को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीच्या घोटाळयाच्या आरोपाप्रकरणी शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित यांना ईडीने समन्स बजावले आहे.
घरात ईडीकडून छापे सुरू असताना आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुंबईतील कांदिवली येथील घरी सकाळी 8 वाजल्यापासून छापेमारी सुरू असताना अडसूळ यांची तब्येत बिघडली.
त्यांना गोरेगाव येथील लाईफ लाईन मेडीकेअर रुग्णालयात दाखल केले आहे.अभिजीत अडसूळ त्यांच्यासमवेत रुग्णालयात आहेत.शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून संघर्ष सुरू आहे.
सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसूळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.
ईडीने आज सकाळी ८ च्या सुमारास अडसूळ यांना समन्स पाठवले आहेत. तसंच, चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे अशी सूचनाही करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App