विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील लसीकरणाने ३२ कोटींचा टप्पा ओलांडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्व मंत्र्यांनी ही आकडेवारी ट्विट केली आहे. हिच आकडेवारी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान आहे, असे म्हटले आहे.Amrita Fadnavis said, yes, I am a Bhakt and I am proud of him
२१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढत आहे. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून लसीकरणाचा वेग वाढला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस दिले आहेत.
पंतप्रधान मोदींनी देखील ट्विट करत सवार्ना मोफत लस देण्यात येणार असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येत आहे! ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत अशा सर्वांचे अभिनंदन. सर्वांसाठी मोफत लस हे आमचे वचन कायम आहे. सर्वांना लस, मोफत लस असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक (३२,३६,६३,२९७) लसीचे डोस देण्यात आले आहेत. दुसºया क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन (७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App