विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीसांच्या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांचे आजपर्यंत तीनदा भेट घेतली. या भेटीगाठींमुळे शरद पवारांच्या भूमिकेविषयी राजकीय संभ्रम तयार झाला. इतकेच नाही, तर आपले घटलेले महत्त्व लक्षात घेऊन ते बंगलोरच्या बैठकीला गेले नाहीत.Ajitdad’s double game encounter; Suspicion spread within the Sharadnishtha clan
पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांच्या या गाठीभेटींमुळे शरदनिष्ठ गोटातच संशयाची भीती तयार झाली आहे. वास्तविक शरद पवारांच्या भूमिकेत या भेटीगाठी मुळे कोणताही बदल झाला नसल्याचा अधिकृत खुलासा जयंत पाटलांनी केला असला तरी आत्तापर्यंत पिक्चर मध्ये नसलेल्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्या तोंडून जी प्रतिक्रिया व्यक्त झाली त्यातून शरदनिष्ठ गोटात कशी भीती पसरली आहे, याचे दर्शन झाले.
शरद पवारांनी एकदा आपली भूमिका ठामपणे स्पष्ट केल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये येऊन त्यांची भेट घेणे योग्य नाही. पवारांच्या सौजन्याचा कुणी फायदा घेता कामा नये, असे उद्गार विद्या चव्हाण यांनी काढले.
याचा अर्थ अजितदादा आणि त्यांचे समर्थक पवारांना वारंवार भेटून त्यांचे मन वळवतील आणि ते परत आणि शरद पवार परत एकदा भूमिका बदलून सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी मोदींबरोबर समझोता करतील ही भीती शरदनिष्ठ गोटात आहे.
पवारांच्या भूमिकेत बदल
अजितदादांच्या कथित बंडखोरीनंतर पवारांनी गेल्या आठवड्याभरात अत्यंत कडक ते सौम्य असा भूमिका बदल आधीच केला आहे. पवारांनी अगदी सुरुवातीला आपले फोटो लावू नका, असा दम अजितनिष्ठ गटाला दिला होता पण अजितनिष्ठ गटाने तो धुडकावला. आपल्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये अजितनिष्ठ गटाने पवारांचे फोटो लावले. त्यावर पवारांनी नंतर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही किंवा अजितनिष्ठांना आपला फोटो लावण्यास प्रतिबंधही घातला नाही.
त्यामुळे अजितनिष्ठ गटाचा हुरुप वाढला आणि त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांशी तीनदा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रत्येक भेटीची परवानगी पवारांनी स्वतः दिली. त्यामुळेच पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेविषयी काँग्रेसमध्ये विशेषतः विरोधी गोटामध्ये पुन्हा संशय तयार झाला आणि आता तर खुद्द शरदनिष्ठ गोटा मध्ये देखील तोच संशय तयार होऊन पवारांची नेमकी भूमिका काय आणि ते केव्हा बदलतील??, याची भीती तयार झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more