“मनधरणी” किंवा “मनसोडणी”, काही झाले तरी शिंदे – फडणवीस सरकारला डग नाही ही खरी पवारांची अडचण!!


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या तीन दिवसांमध्ये शरद पवारांची तीनदा भेट घेतली त्या प्रत्येक वेळी आपले समर्थक त्यांनी आपल्याबरोबर नेले होते. सुरुवातीला फक्त प्रतिभाताईंच्या शस्त्रक्रियेमुळे कौटुंबिक भेटीसाठी अजितदादा एकटे सिल्वर ओक वर गेले होते. तेव्हा त्यांनी “बंडखोरी” करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक आठवडा लोटला होता. पण तरी देखील सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवर बोलून अजितदादा सिल्वर ओक वर गेले. Whatever happens, Pawar’s real problem is that the Shinde-Fadnavis government has no clue

त्यानंतर काल राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांबरोबर यशवंतराव सेंटर मध्ये जाऊन अजितदादांनी पवारांशी चर्चा केली. प्रफुल्ल पटेलांनी पवारांना राष्ट्रवादी एकसंध राखण्याची विनंती केली. पवारांनी कालच रात्री आपली भूमिका स्पष्ट करून भाजप बरोबर जाणे शक्य नाही, असे कळवून टाकले.

पण तरीही आज त्या भेटीगाठींचे पुन्हा जसेच्या तसे रिपीटेशन झाले. फक्त आजच्या भेटीत अजितदादांबरोबर राष्ट्रवादीचे 30 आमदारही होते.

त्याआधी विधानसभेत विरोधी बाकांवर शरदनिष्ठ गटाचे फक्त 8 आमदार बसलेले दिसले.

पण अर्ध्या तासातच विधानसभा तहकंब झाल्याने सर्व आमदारांना मोकळीक मिळाली आणि अजितदादा आपल्या 30 आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले. तेथे सर्व आमदारांनी पवारांची मनधरणी केली. प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकसंध राखण्याची विनंती केली. पण पवारांनी आपली भूमिका बदलली नसल्याचे जयंत पाटलांनी नंतर पत्रकारांना सांगितले.

एवढी सगळी राजकीय मशक्कत गेले तीन दिवस सुरू आहे, तरी देखील पवारांनी अजितनिष्ठ गोटाशी आपला “संवाद” थांबवलेला नाही. याचा अर्थ कोणीतरी येऊन आपले मनधरणी करावी आणि मग आपण लोकशाही मानत असल्याने आमदारांच्या बहुमताच्या आधारे आपण निर्णय घेतल्याचे पवारांना दाखविता यावे, यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे, असे दिसते.पण त्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतो, तो म्हणजे पवारांची “मनधरणी” झाली काय!! किंवा “मनसोडणी” झाली काय!!, त्याने विद्यमान शिंदे – फडणवीस सरकारला कोणती डगच लागत नाही.

कारण शिंदे – फडणवीसांकडे स्वतःचे 165 आमदारांचे बहुमत आहे. अजितदादांच्या रुपाने त्याला तिसरे इंजिन जोडले गेल्याची मखलाशी शिंदे – फडणवीस यांनी केली असली तरी त्यात तिसऱ्या इंजिनाची महाराष्ट्राचे सरकार टिकवण्यासाठी बिलकुलच गरज नाही. त्या अर्थाने पवारांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतली तरी त्यांचा
महाराष्ट्रातला “पॉलिटिकल रेलेव्हन्स” संपला आहे.

याचा अर्थच पवारांची “मनधरणी” झाली तर फारतर राष्ट्रवादी एकसंध राहील आणि त्यांनी “मन सोडले”, तर राष्ट्रवादी दुभंगेल. या पलीकडे पवारांच्या “मनधरणी” किंवा “मनसोडणीला” फारसा अर्थ उरलेला नाही.

आकडे गेले पवारांविरोधात

2019 मध्ये पवारांनी जो खेळ केला, तो आकड्यांच्या आधारे केला होता. त्या खेळाला ठाकरेंची साथ होती म्हणून तो घडू शकला. पण आता आकडे आणि “पॉलिटिकल पर्सेप्शन” दोन्ही पवारांच्या विरोधात आहेत आणि हीच खरी पवारांची अडचण आहे.

आपण करू ती “पूर्व” ही पवारांची आत्तापर्यंत धारणा राहिली. आपण सरकारे बनवतो, सरकारे मोडतो; आपण कोणताही पक्ष मोडतो, पक्ष फोडतो, नवा पक्ष घडवतो, हा पवारांचा गंड आहे, तो अजितदादांच्या कथित बंडाच्या रूपाने मोडून गेला आहे.

आता पवारांच्या कुठल्याही भूमिकेमुळे राष्ट्रवादी एकसंध होवो अथवा दुभंगो, त्याने विद्यमान सरकारला काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे पवारांची कुठलीच खेळी त्यांच्या जुन्या राजकारणाच्या अर्थाने “इफेक्टिव्ह” होणार नाही आणि हीच पवारांची खरी अडचण आहे.

किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणात हा खरा “मोदी – फडणवीस इफेक्ट” आहे. कारण समोरच्या विरोधकाला अस्तित्वात ठेवून तो करीत असलेल्या विरोधातल्या पोपटाचा प्राण काढून घेणे हे त्यांच्या राजकारणाचे खरे वैशिष्ट्य आहे!!

Whatever happens, Pawar’s real problem is that the Shinde-Fadnavis government has no clue

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*