विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajitdada उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीनंतर वेगळे समीकरण जुळवायच्या बेतात, पण स्वतः अजितदादा मात्र सावध पवित्र्यात!! अशी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था झाली आहे.Ajitdada
नवाब मलिक आणि दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीनंतरच्या समीकरणाचे सूतोवाच केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये अजितदादा महायुतीला सोडून जाणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र स्वतः अजितदादांनी त्या संदर्भात बचावात्मक आणि सावध पवित्रा घेतला. कारण निवडणुकीनंतर नवीन समीकरण जुळवायचा विषय आत्ताच काढला आणि नंतर ते समीकरण जुळले नाही, तर जो काही राजकीय फटका बसेल, तो अजितदादांच्या सहकाऱ्यांना बसणार नसून तो खुद्द अजितदादांना बसण्याची भीती खुद्द त्यांनाच वाटत असल्याचे बोलले जात आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही येवो, केंद्रात मोदी – शाहांचीच सत्ता टिकून राहणार आहे म्हणून अजितदादांनी सावध पवित्रा घेतला आहे.
अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली.
अजित पवार म्हणाले :
संविधानाने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य, विचारधारा दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये जे आपल्याला योग्य वाटतं त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही. पण जे वाटत नाही त्याबद्दल बोलून पुढे गेलं पाहिजे.
शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा एक आहे का?? वेगवेगळ्या व्यक्ती आल्यानंतर त्यांचे विचार आणि मत बदलतात. अलिकडेच महाराष्ट्राने 1989 नंतर ठरवलं आहे की, कोणत्याही एका पक्षाला बहुमताचं सरकार द्यायचं नाही. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन काम करावं लागतं. या घटना होत राहणार आहेत. जोपर्यंत महाराष्ट्राला एका व्यक्तीच्या हातात पूर्ण सत्ता द्यावीशी वाटत नाही तोपर्यंत असं चालत राहील. कारण प्रत्येक भागातील वेगवेगळी विचारधारा आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांचा बहुमत लागतं. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट द्यावं लागतं.
विधानसभा निवडणुकीनंतर समीकरणे वेगळी होतील,हे नवाब मलिकांचं स्वत:चं मत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पक्षाचं मत काय आहे, त्याला महत्त्व आहे. शेवटी आम्ही सर्व एकत्र बसून आमच्या पक्षाचं मत आणि भूमिका काय आहे ते ठरवतो. आम्ही प्रमुख लोकं एकत्र बसलो, त्यातील 15 लोकांनी एक मत व्यक्त केलं आणि 6 लोकांनी वेगळं मत व्यक्त केलं. पण तरी त्या 6 लोकांना 15 जणांचं मत ऐकून पुढे जावं लागतं. पण मत व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना आहे.
निवडणुकीनंतर वेगळी समीकरणे??
निवडणुकीनंतर वेगळे समीकरण येईल का??, यावर किती लोकं काय-काय बोलतात. मी ते सांगितलं तर महाराष्ट्रातले लोक म्हणतील, अजित पवार तेच बोलत आहेत. म्हणून मला ते शब्दच उच्चारायचे नाहीत. माझं म्हणणं आहे की, तुम्ही या गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. महायुतीला भरघोस मतांनी निवडून आणायच्या कामाला आम्ही सगळे लागलो आहोत. मला त्यात वेगळं काही बोलून नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App