विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधले दोन्ही गट एकमेकांवर आत्तापर्यंत वेगवेगळ्या शब्दांमध्ये शरसंधान साधतच होते, पण आत्तापर्यंत तुला नाहीत त्यांची भाषा सौम्य होती. आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तिखट प्रहार करताना नुसते सेल्फी काढून काम होत नसतात, संसदेत भाषणे करून काम होत नसतात, असा हल्लाबोल केला, त्यावर जितेंद्र आव्हाड्यांनी अजित पवारांना हिंदी – इंग्रजीत भाषण करता येत नाही म्हणून ते बाथरूम मध्ये लपत होते, असे वाभाडे काढले.Ajitdada used to hide in the bathroom as he could not speak in Hindi – English; Wabhada made by Ahwada!!
उपमुख्मंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.
त्यांनी कायदेशीररित्या 2022 मध्ये निवडणूक लढवायला हवी होती. स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की बाथरूममध्ये असायचे. कारण त्यांना हिंदी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही, त्यांच्या ह्या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या पण आता आम्हाला हे सांगावे लागले, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
ते पुढं म्हणाले की जेव्हा जेव्हा दिल्लीत भाषणाची वेळ यायची तेव्हा ते बाथरुममध्ये असायचे, जेव्हा जेव्हा शरद पवारांची लोकप्रियता शिखरावर असायची तेव्हा तेव्हा खालून पिन मारुन हवा काढायचे, राजीनामा द्यायचे, काहीतरी विचित्र बोलायचे. पुणे जिल्हा बॅंकेत त्यांनी केलेले घोटाळे शरद पवारांवर आले होते. मग दु:ख व्यक्त करत राजीनामा दिला. ही नाटकं कशाला केली? चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त शरद पवार यांच्यामुळे मिळालं, हे उपकार निदान मनात तर ठेवा, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
इतका कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेला नाही. परत रक्ताचे नातं जोडता, मी तुमच्या भावाचा मुलगा होतो. अरे भावाचा मुलगा होता म्हणूनच चार वेळा उपमुख्यमंत्री केलं, त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनचं सगळं माफ केलं. आमच्यासारख्या माणसाने असे केले असते तर लाथ मारुन हाकलून दिले असते, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App