निवडणूक आयोगाने निकाल दिला 7 फेब्रुवारीला; पवारांना धावपळीने सुप्रीम कोर्टात हवी “अर्जंट” सुनावणी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची यासंदर्भात निवडणूक आयोगाने 7 फेब्रुवारीला निकाल देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिले. शरद पवारांना त्यांच्याच शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव 8 फेब्रुवारीला दिले. त्यानंतर काल 15 फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवत शरद पवारांचे तीन अर्ज फेटाळले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकी संदर्भात कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत, असा ठपका विधानसभा अध्यक्षांनी शरद पवार गटावर ठेवला.the Election Commission of India officially recognising Ajit Pawar faction as the ‘real’ Nationalist Congress Party

निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांनी दिलेल्या निकालानंतर शरद पवार गटाला “आत्ता” “जाग” आली असून आज 16 फेब्रुवारीला शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात “अर्जंट” सुनावणीसाठी अर्ज दाखल केला आहे.



अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) म्हणून अधिकृतपणे मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्धच्या याचिकेवर शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात “अर्जंट” म्हणजे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणाचा अर्जंट सुनावणीच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांनी समान निकाल दिल्यामुळे शरद पवार गटाला येत्या राज्यसभा निवडणुकीत अजित पवारांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू होऊ शकतो. तसे झाल्यास शरद पवार गटाचे विधिमंडळातले अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते, या भीतीपोटी शरद पवार गटाने अभिषेक मनु सिंघवी यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टात “अर्जंट” सुनावणीसाठी अर्ज दाखल केला आहे. आजच्या अर्जंट सुनावणीची अन्य यादी पाहून शरद पवार गटाच्या अर्जाचा विचार करण्यात येईल असे सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

 धावपळ का करावी लागली??

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाचा निकाल येताच सुप्रीम कोर्टात आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ताबडतोब अर्ज करायला हवा होता. सुप्रीम कोर्टाने त्या अर्जावर तातडीची सुनावणी घेऊन निर्णय दिला असता, तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकला असता, असे निरीक्षण कालच ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले होते, पण शरद पवार गटाने त्यावेळी तशी कोणतीच हालचाल केली नसल्याचे यांनी सुचित केले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय देणार याचा अंदाज सगळ्यांना आल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या समान निकालानंतर आपल्या विधिमंडळ पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांच्या गटाने सुप्रीम कोर्टात धावपळ करून “अर्जंट” सुनावणीसाठी आज अर्ज केला आहे.

the Election Commission of India officially recognising Ajit Pawar faction as the ‘real’ Nationalist Congress Party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात