विशेष प्रतिनिधी
मुंबई : हे आता कन्फर्म झालंय, की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार, मग आता सुप्रिया सुळे अजितदादांनी दिलेल्या उमेदवारासमोर लढणार?? की “एस्केप रूट” शोधून बारामतीतून पलायन करणार आणि इतरत्र राजकीय आश्रय शोधणार??, असा सवाल तयार झाला आहे. Ajitdada pawar NCP will election candidate of Baramati
रायगडच्या कर्जत मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात आज दुसऱ्या दिवशी अजितदादांचे भाषण झाले. त्या भाषणात अजितदादांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागांवर कन्फर्म लढणार असल्याचे सांगितले. यात त्यांनी बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांचा उल्लेख केला. त्याचवेळी ठाकरे गटाकडे असलेल्या सध्याच्या लोकसभेच्या जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डोळा आहे. याचेही संकेत अजितदादांनी दिले.
पण लोकसभा निवडणुकीबाबत प्रथमच उघड भाष्य करताना त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आपलाच उमेदवार लढणार असे जाहीर केले. त्यामुळे बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार की अजितदादा कोणता दुसरा उमेदवार देणार??, याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार जर सुनेत्रा पवारांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार असतील, तर त्यांच्यासमोर उभे ठाकून सुप्रिया सुळे यांना आव्हान देणार की स्वतःसाठी स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी बारामतीतून “एस्केप रूट” शोधत म्हणजे पलायन करत अन्यत्र राजकीय आश्रय शोधणार??, असा सवाल तयार झाला आहे.
आपण वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतो, असे उद्गार सुप्रिया सुळे यांनी याआधी किमान दोनदा काढले होते. त्यावेळी देखील बारामतीतून सुप्रिया सुळे बारामतीतून पलायन करण्याची तयारी करीत असल्याची चर्चा झाली होती. अजित पवारांच्या राजकीय झंझावातापुढे आपले काही चालणार नाही आणि आपले राजकीय अस्तित्व टिकणार नाही, याची खात्री झाल्यामुळे सुप्रिया सुळे बारामती पासून दूर जाऊन वर्ध्यात राजकीय आश्रय शोधत असल्याची ही चर्चा होती.
त्याचवेळी एक उपचर्चा देखील होती, ती म्हणजे बारामतीतून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पवार घराण्यातलाच खासदार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी देखील वर्ध्याची “सेफ” जागा निवडून त्यादेखील खासदार असा “राजकीय लाभ” मिळवण्याचा पवार कुटुंबीयांचा होरा असल्याचे त्यावेळी बोलले गेले होते.
आता अजित पवारांनी उघडपणे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असे जाहीर केल्यानंतर या लढतीतला एक भाग स्पष्ट झाला आहे, मग आता सुप्रिया सुळे अधिकृतपणे बारामतीतून “एस्केप रूट” शोधत म्हणजेच पलायन करत अन्यत्र कोठे जाणार??, की त्यांनीच आधी सांगितल्याप्रमाणे वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवून आपले राजकीय अस्तित्व टिकवणार की अन्य काही मार्गाने त्या विधानसभेत पोहोचणार??, अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App