विशेष प्रतिनिधी
मुंबई : आघाडी असो वा युती असो आपल्याच मित्र पक्षांना कुरतडून आपली ताकद वाढवायची हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या राजकीय प्रवृत्तीचे वैशिष्ट्य आहे. याचा प्रत्यय अजितदादांच्या राष्ट्रवादीने महायुतीतल्या मित्र पक्षाला देखील आणून दिला. पुतण्याला वाचवण्यासाठी अजितदादांनी कर्जत जामखेड मध्ये सभा घेतली नाही. याची कबुली स्वतःच त्यांनी आज कराडमध्ये दिली. Ajit Pawar with Rohit pawar about karjat Jamkhed
याची कहाणी अशी :
कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांचे नातू रोहित पवार विरुद्ध भाजपचे माजी मंत्री राम शिंदे अशी जोरदार टक्कर होती. ही टक्कर अखेरच्या फेरीपर्यंत चालली. परंतु, अखेरच्या टप्प्यात रोहित पवारांनी 1243 मतांनी कसा बसा विजय मिळवला.
राम शिंदे यांनी रोहित पवारांचा मतदारसंघ पूर्णपणे खऱ्या अर्थाने पोखरून काढला होता. वास्तविक तो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ होता. उलट रोहित पवारांनीच बारामती मधून बाहेर पडून कर्जत जामखेड मध्ये राजकीय घुसखोरी केली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रोहित पवारांना पाडून कर्जत जामखेड मतदारसंघ पुन्हा खेचून घ्यायचा यासाठी भाजपने तिथे आपली सर्व ताकद पणाला लावली होती. शरद पवारांनी देखील ती निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची करून स्वतः तीन सभाच्या मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या होत्या. त्यामुळे रोहित पवार विरुद्ध राम शिंदे ही टक्कर जबरदस्त होणार याच्या अटकळी आधीच बांधल्या गेल्या होत्या.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी प्रितीसंगम म्हणजे पवित्र स्थळ. चव्हाण साहेबांनीच एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती जपण्याचे संस्कार महाराष्ट्रावर केले. त्यानुसारच आज प्रितीसंगमावर आदरणीय अजितदादांची भेट झाली. त्यांची राजकीय वाटचाल स्वतंत्र दिशेने सुरु असली तरी त्यांचा राजकीय… pic.twitter.com/Oc8eQYdwfN — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 25, 2024
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी प्रितीसंगम म्हणजे पवित्र स्थळ. चव्हाण साहेबांनीच एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती जपण्याचे संस्कार महाराष्ट्रावर केले. त्यानुसारच आज प्रितीसंगमावर आदरणीय अजितदादांची भेट झाली. त्यांची राजकीय वाटचाल स्वतंत्र दिशेने सुरु असली तरी त्यांचा राजकीय… pic.twitter.com/Oc8eQYdwfN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 25, 2024
पण रोहित पवारांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. त्याचे “रहस्य” अजितदारांच्या तोंडून आज बाहेर आले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अजित पवार कराडला प्रीतीसंगमावर त्यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहायला गेले होते. तिथे अवचितपणे रोहित पवारांची आणि अजितदादांची भेट झाली, त्यावेळी अजितदादांनी त्यांच्याशी बोलताना मिश्किल टिपण्णी केली. काकांचं दर्शन घे, असे सांगत रोहित पवारांना त्यांनी शहाण्या तू थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती, तर काय झालं असतं, असं अजितदादा रोहित पवारांना म्हणाले. त्यावर तिथल्या उपस्थितांमध्ये हशा पिकला.
पण अजितदादांच्या वक्तव्यातून त्यांनी महायुतीमध्ये केलेली चालबाजी उघड्यावर आली. कर्जत जामखेड मधून पुतण्याला वाचवण्यासाठी अजितदादांनी तिथे जाऊन सभा घेतली नाही, हे सत्य त्यांच्याच तोंडून बाहेर आले. महायुतीच्या प्रचंड विजयाच्या नगाऱ्याच्या आवाजात भाजपचे नेते अजितदादांच्या या चालबाजीची दखल कशी आणि केव्हा घेतील??, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App