नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इमोशनल आहेत, तर अजितदादांचे राजकारण त्याच्या उलटे म्हणजे ते अतिशय प्रॅक्टिकल आहेत, असे उद्गार नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत काढले. एक प्रकारे आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी राजकीय सर्टिफिकेट देऊन टाकले. आपले दोघांशीही व्यवस्थित जमते, असा निर्वाळा देखील फडणवीसांनी या मुलाखतीत दिला.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार होते, पण त्यांनी गृह खाते मागितले होते. त्यामुळे एवढे दिवस शपथविधी लांबला, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होती. त्या चर्चेचे देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले ते खंडन करतानाच त्यांनी एकनाथ शिंदे इमोशनल, तर अजितदादा प्रॅक्टिकल असल्याचे उद्गार काढले.
देवेंद्र फडणवीस यांच्या उद्गारांमधून एकनाथ शिंदे यांना “राजकीय त्याग” करताना थोडा त्रास झाला, असे “बिटवीन द लाईन्स” समोर आले. त्याचवेळी अजितदादा प्रॅक्टिकल असल्यामुळे त्यांना आत्ता तरी कोणता “त्याग” करावा लागला नसल्याचे फडणवीस यांनी न सांगताच उघड झाले. पण म्हणून “प्रॅक्टिकल” अजितदादांच्या पुढे राजकीय भविष्यामध्ये “त्यागाचे ताट” वाढून ठेवण्यात येणारच नाही, असे मात्र फडणवीस यांनी कुठेही सूचित केले नाही.
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या “त्यागा”चा कोटा पूर्ण केला आहे. भाजप हायकमांडने या दोन्ही नेत्यांकडून अपेक्षित केलेला “त्याग” त्यांनी आधीच करून आपापले राजकीय भवितव्य सुरक्षित केले आहे. दोघांनीही मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत, उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे हा “त्याग” केल्याने भाजप हायकमांडची प्रॅक्टिकल इच्छापूर्ती झाली आहे.
CM फडणवीस म्हणाले- विरोधकांना माफी, हाच माझा बदला, माझी खलनायकासारखी प्रतिमा तयार केली, सर्व विसरून पुढे जाणार
मग आता इथून पुढे त्यागाचा कोटा पूर्ण करण्याची जबाबदारी प्रॅक्टिकल अजित पवारांवर येऊन पडण्याची शक्यता आहे आणि ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या संख्येत आणि खातेवाटपात प्रतिबिंबित होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात “कलंकित नावे” नकोत, असे आधीच भाजप हायकमांड शिंदे आणि अजितदादांना स्पष्ट बजावले आहे. यामध्ये शिंदे पेक्षा अजितदादांची राजकीय गोची अधिक केली आहे. कारण अजितदादांचे 41 आमदार निवडून आले असले तरी मंत्री पदासाठी त्यांना चॉईस आणि संख्या फार कमी आहे. इतकेच नाही, तर त्यातली निवड देखील स्वतः अजितदादा करण्यापेक्षा फडणवीस करण्याची दाट शक्यता आहे.
महायुतीमध्ये फडणवीसांनी नवाब मलिक यांच्या बाबतीत आपला वरचष्मा आधीच दाखवून दिला होता. अजितदादांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होईपर्यंत नवाब मलिकांना त्यांच्या राष्ट्रवादीत घेता आले नव्हते. प्रत्यक्ष निवडणूक काळामध्ये नवाब मलिकांना त्यांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून तिकीट देता आले नव्हते. अजितदादांनी त्यांच्या ऐवजी त्यांची मुलगी सना मलिक हिला तिकीट देऊन निवडून आणले, पण नवाब मलिकांना मानखुर्द शिवाजीनगर या “असुरक्षित” मतदारसंघात तिकीट देऊन त्यांचा परस्पर पत्ता कापावा लागला. नवाब मलिक निवडणुकीत पडल्याने सुंठे वाचून खोकला गेला. हा फडणवीसांच्या वरचष्म्याचा करिष्मा होता.
– राष्ट्रवादीच्या खातेवाटपातला “त्याग”
आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजितदादा जर हसन मुश्रीफ यांच्यासारखे वादग्रस्त नाव लावून धरणार असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा हायकमांड मान्य करतीलच, याची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे फडणवीस मंत्रिमंडळावर संपूर्णपणे फडणवीसांची छाप ठेवण्यावर स्वतः फडणवीसांचा आणि भाजपचा कल राहील आणि त्याद्वारे अजितदादांचा “त्यागा”चा कोटा निश्चित होईल.राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या, नावे आणि खाती याबाबत राष्ट्रवादीचा त्यागाचा कोटा पूर्ण करण्याची संधी भाजप “प्रॅक्टिकल” अजितदादांना देण्याची दाट शक्यता आहे. खुद्द अजितदादांना त्यांचे लाडके अर्थ खाते मिळेल की नाही??, याविषयी देखील मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त केला जात आहे. कारण शेवटी भाजपची राजकीय संस्कृती “भोगा”पेक्षा “त्यागा”वर अधिक आधारित आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App