विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit pawar महाविकास आघाडीतले दोन घटक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या गोटातला मुख्यमंत्री करण्यासाठी स्पर्धेत उतरले असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा सर्वोत्तम मुख्यमंत्री सांगून टाकला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नावे त्यांनी घेतली नव्हती. त्यांनी वेगळेच नाव सांगितले होते.
आज शरद पवारांचे पुतणे, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महाराष्ट्राच्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही नावे घेतली नाहीत. उलट काँग्रेसी संस्कृतीत शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या गेलेल्या एका नेत्याचे नाव अजितदादांनी घेतले. त्यामुळे एकाच वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी लातूरमध्ये बोलताना महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. त्यांनी उत्तम पद्धतीने सरकार चालवून महाराष्ट्राचा विकास साधला होता अशी स्तुतीसुमने उधळली होती. शिवसेना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उतावळी असताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे नावही उच्चारले नव्हते.
आज अजित पवारांनी देखील महायुतीमध्ये दुसरे उपमुख्यमंत्रीपद भोगताना देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांची सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नावे घेतली नाहीत, तर त्यांनी देखील विलासराव देशमुख यांचेच नाव घेतले. मला अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याचा प्रसंग आला ही वस्तुस्थिती आहे. आता एका पक्षाचे सरकार येणे शक्य नाही. आपण आघाडीच्या युगात आलो आहोत. आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याची चांगली रणनीती विलासराव देशमुख यांनी तयार केली होती. माझ्या मते ते सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असे अजित पवार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App