विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीत राहून सत्तेच्या खुर्च्या भोगा, पण निवडणुकीत काड्या करा!!, असला सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा “उद्योग” सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला अजित पवारांच्या आमदाराने पाठिंबा दिला आहे. पण हा पाठिंबा देताना राष्ट्रवादीचे आमदार उघडपणे विरोधकांच्या गोटात मात्र जायला तयार नाहीत Ajit pawar playing double game with mahayuti
त्या जाहिरातीची चर्चा
राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये असतानाच आता अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांपैकी एक असलेले दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनीही आपल्या वाढदिवसाला शरद पवारांचे फोटो छापले आहेत. आज नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस असल्याने काही वर्तमानपत्रात शरद पवारांचा फोटो छापण्यात आला आहे, तर काही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीत एक रिकामा पांढरी चौकट ठेवण्यात आली आहे. ही चौकट कुणासाठी??, या चौकटीत कुणाचा फोटो येणार??, नरहरी झिरवाळ पण वेगळा मार्ग स्वीकारणार का?? अशा विविध चर्चांना यामुळे उधाण आले आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिला पाठिंबा
नरहरी झिरवाळ वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वाढण्यामागील आणखी एक कारण म्हणजे त्यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी थेट ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना पाठिंबा जाहीर केला आहे. झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये गुळवेंचं काम करण्याचे आदेश दिले आहेत.
वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट
नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली. झिरवाळ यांच्याकडून संदीप गुळवे यांना आगळीवेगळं बर्थडे रिटर्न गिफ्ट देत थेट जाहीर पाठिंबा देण्यात आला. कौटुंबिक संबंध असल्याने आपण गुळवेंना पाठिंबा देत असल्याचं झिरवाळ यांनी जाहीर केलं आहे.
भुजबळांची नाराजी का?
दरम्यान, दुसरीकडे नाशिकचे अजित पवार गटाचे आमदार तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ देखील नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. भुजबळ यांना लोकसभा तसेच राज्यसभा निवडणुकीमध्ये डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या भुजबळांना अगदी शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यानंतर राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठीही त्यांनी रस दाखवला होता. मात्र राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीमधून लोकसभा निवडणूक पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळेच भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.
पण भुजबळ असोत, वा झिरवळ असोत सत्तेच्या खुर्च्या भोगत निवडणुकीत काड्या करण्याचे काम सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App